सहारेवर अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:08 AM2021-06-02T04:08:11+5:302021-06-02T04:08:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजपरिवारातील सदस्याला ब्लॅकमेल करून एक लाख रुपयाची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिशरण ऊर्फ ...

Fraud charges already on Sahara | सहारेवर अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे

सहारेवर अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजपरिवारातील सदस्याला ब्लॅकमेल करून एक लाख रुपयाची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिशरण ऊर्फ बंडू सहारेविरोधात अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याची बाब समोर आली आहे. फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात सहारेला रेल्वेतील नोकरीतून काढण्यात आले होते. मात्र तरीदेखील तो सक्रिय होता. तथाकथित नेते व पत्रकारांशी त्याचे धागेदोरे जुळले होते व सखोल चौकशीतून आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुन्हे शाखेने ३० मे रोजी दुपारी मेयो इस्पितळ चौकात एक लाखाची खंडणी घेताना सहारेला रंगेहाथ पकडले होते. ही खंडणी घेण्यासाठी सहारे तक्रारदाराला तुमचे रणजित सफेलकरसोबतचे फोटो प्रकाशित करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर सापळा रचून सहारेला अटक करण्यात आली.

सहारे रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून नोकरीवर असताना एका मोठ्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर नोकरीवरून काढण्यात आले होते. त्यानंतर सहारे नेत्यांच्या जवळ गेला व राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकेकाळी उत्तर नागपुरातून प्रकाशित होणारे एक वर्तमानपत्र, यूट्यूब चॅनल व पोर्टलशी जुळून काही तथाकथित नेते व पत्रकारांच्या मदतीने खंडणी वसुली करायचा. पोलीस व प्रशासनात ओळख असल्याची धमकी देत तो लोकांना जाळ्यात ओढायचा. जर पोलिसांनी सहारे व त्याच्याशी जुळलेल्या लोकांची चौकशी केली तर ब्लॅकमेलिंगची अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. प्राथमिक चौकशीत पाच ते सहा लोकांची नावे समोर आली आहेत.

Web Title: Fraud charges already on Sahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.