किराणा, काॅस्मेटिक साहित्यात अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:58+5:302021-08-22T04:11:58+5:30
कळमेश्वर : कंपनीचे किराणा व काॅस्मेटिक साहित्य नियाेजित ठिकाणी पाेहाेचवून न देता त्याची मध्येच अफरातफर केल्याचा प्रकार नुकताच घडला. ...
कळमेश्वर : कंपनीचे किराणा व काॅस्मेटिक साहित्य नियाेजित ठिकाणी पाेहाेचवून न देता त्याची मध्येच अफरातफर केल्याचा प्रकार नुकताच घडला. यात कळमेश्वर पाेलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या साहित्याची एकूण किंमत ८७ हजार २९७ रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
टीव्हीएस सप्लाय चेन साेल्युशन नामक कंपनीने त्यांचे किराणा व काॅस्मेटिक साहित्य नीलेश हत्ती, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर, आकाश मारी, रा. सावंगी व अजित जगदळे, रा. वाडी यांच्या स्वाधीन करून त्यांना हे साहित्य नियाेजित ठिकाणी पाेहाेचवून देण्याची कंपनी व्यवस्थापनाने सूचना केली हाेती. या तिघांनीही हे साहित्य निमजी (खदान), ता. कळमेश्पर येथून ताब्यात घेतले आणि बाेरखेडी परिसरात त्या साहित्याची मध्येच विल्हेवाट लावली. हा प्रकार लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत अढाऊ, रा. काठाेरा, जिल्हा अमरावती यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ४०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मन्नान नाैरंगाबादे करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे कुणालाही अटक करण्यात आली नव्हती, असेही नाैरंगाबादे यांनी सांगितले.