हल्दीरामच्या नावाचा गैरवापर उघड : अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:04 AM2019-04-24T01:04:21+5:302019-04-24T01:05:34+5:30

फूड मार्केटमधील मोठे नाव असलेल्या हल्दीराम फूड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावाचा गैरवापर करीत एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कळमना पोलिसांनी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

The fraud of Haldiram's name exposed: many frauds | हल्दीरामच्या नावाचा गैरवापर उघड : अनेकांची फसवणूक

हल्दीरामच्या नावाचा गैरवापर उघड : अनेकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देकंपनीतर्फे तक्रार, कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फूड मार्केटमधील मोठे नाव असलेल्या हल्दीराम फूड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावाचा गैरवापर करीत एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कळमना पोलिसांनी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने ९ एप्रिल ते १२ एप्रिल २०१९ दरम्यान विविध ग्राहकांकडून वेगवेगळे ऑर्डर घेतले. त्यांना मालाची रक्कम बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ३८२६२० ९१७३७ मध्ये जमा करण्यास सांगितले. हा खाते क्रमांक निखिल कुमार मोहनलाल (रा. गुरुद्वारा रोड, दानापूर, पटना) यांच्या नावाचा आहे. आरोपीने त्यांनाही अंधारात ठेवून बँकेच्या आयएफसी कोड, एसीबीआय किंग्स वे नागपूरचे बनावटी करून ३१, ७०० रुपये हडपले. दरम्यान, रक्कम जमा केल्यानंतरही मालाचा पुरवठा न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीने भंडारा मार्गावरील पारडीतील हल्दीरामच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर ही बनवाबनवी उघड झाली. कंपनीतर्फे कळमना पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चौकशी सुरू करताच आरोपीने हल्दीराम फूड अ‍ॅन्ड इंटरनॅशनल प्रा. लि. ऐवजी हल्दीराम फूड स्रॅक्स प्रा. लि. नोएडा अशा नावाने कंपनीचा बनावट लोगोही तयार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. आरोपीने केवळ हल्दीराम कंपनीचीच नव्हे तर कंपनीच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: The fraud of Haldiram's name exposed: many frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.