कौन बनेगा करोडपतीच्या नावाने करताहेत ‘कंगालपती’; नागपुरात ठगबाजीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 09:44 AM2018-04-03T09:44:07+5:302018-04-03T09:44:16+5:30

नागपुरात महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र असलेले कौन बनेगा करोडपतीचे पोस्टर तसेच २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून सायबर टोळीने अनेकांना कंगालपती बनविण्याचे षङ्यंत्र रचले आहे.

Fraud in the name of Kaun Banega Crorepati; New gang in Nagpur | कौन बनेगा करोडपतीच्या नावाने करताहेत ‘कंगालपती’; नागपुरात ठगबाजीचा नवा फंडा

कौन बनेगा करोडपतीच्या नावाने करताहेत ‘कंगालपती’; नागपुरात ठगबाजीचा नवा फंडा

Next
ठळक मुद्दे२५ लाखांच्या लॉटरीचे आमिषसायबर टोळीकडून देशभरात अनेकांना गंडा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र असलेले कौन बनेगा करोडपतीचे पोस्टर तसेच २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून सायबर टोळीने अनेकांना कंगालपती बनविण्याचे षङ्यंत्र रचले आहे. दुसऱ्याची रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेण्यासाठी ठगबाजीचा हा नवा फंडा गेल्या दोन आठवड्यापासून सायबर टोळीने अवलंबला आहे. होय, देशभरात अनेकांच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अशाप्रकारे रोज हजारो आॅडिओ क्लीप येत असून, हुरळलेली मंडळी कथित लॉटरीची रक्कम मिळवण्याच्या नादात गंडविली जात आहे.
खोदकामात गुप्तधन (सोने) सापडले आहे, ते अत्यल्प रकमेत देण्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लुटणारी टोळी राजस्थान, मध्य प्रदेशात पूर्वी सक्रिय होती. या टोळीने देशभरात हैदोस घालून अनेकांचे लाखो रुपये लुटल्याच्या बातम्या यायच्या. पुढे ती टोळी थंडावली. दहा वर्षांपूर्वी नायजेरियन टोळी सक्रिय झाली. तुम्हाला अमूक एवढ्या डॉलरचे बक्षीस लागल्याचे मोबाईलवर किंवा मेसेज किंवा संकेतस्थळावर मेल पाठवून नागरिकांना लुटण्याचा सपाटा नायजेरियन टोळीने सुरू केला. या टोळीचा कित्ता गिरवत देशातील अनेक प्रांतात सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. कधी लॉटरी लागल्याचे, कधी मोबाईल फोन अथवा महागडे गिफ्ट पाठविण्याचे तर कधी विदेशी फेसबुक फ्रेण्डच्या नावाखाली कोट्यवधींचे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यच नव्हे तर उच्चशिक्षित, धनिकांनाही लुबाडण्याचा सपाटा लावला आहे.
‘मी अमूक एका बँकेचा मॅनेजर बोलतो. तुमचे जुने क्रेडिट, डेबिट कार्ड ब्लॉक झाले. तुम्हाला नवीन कार्ड द्यायचे आहे, तुम्हाला गिफ्ट पाठवायचे आहे, असे सांगून एटीएम कार्डची किंवा बँक खात्याची माहिती विचारली जाते अन् दुसऱ्याच क्षणाला आपल्या खात्यातून हजारोंची रक्कम आॅनलाईन ट्रान्सफर झाल्याचा मेसेज संबंधिताच्या मोबाईलवर धडकतो. दिल्ली, नोएडा, झारखंड(तारापूर)मधील टोळ्यांचे गुन्हेगार ही सायबर गुन्हेगारी करीत असून, विविध ठिकाणी फसवणुकीच्या या गुन्ह्यांची नोंदही होते. या सायबर गुन्हेगारांची पद्धत एवढी विलक्षण आहे की ते पकडले जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
मात्र, प्रसारमाध्यमातून या गुन्ह्यांचा बोभाटा होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सतर्क झाले असून, या गुन्हेगारांना थोडाफार आळा बसला आहे. त्यामुळे की काय सायबर गुन्हेगारांनी आता कौन बनेंगा करोडपतीच्या नावाने सावज हेरून त्याला कंगालपती करण्याचे षङ्यंत्र रचले आहे. त्यानुसार, कुणाच्याही मोबाईलवर कोणत्याही क्षणी एक व्हॉटस्अ‍ॅप इमेज (फोटो) आणि दुसरी आॅडिओ क्लीप येऊन धडकू शकते. व्हॉटस्अ‍ॅप इमेजमध्ये वरच्या भागात महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र त्यांच्या नावासकट दिसते. त्याखाली इंग्रजीत केबीसी कौन बनेंगा महाकरोडपती असे ठळकपणे लिहून आहे. त्याखाली लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणे आहे.
‘आपके लिए गूड न्यूज है. आपके इस नंबरपे केबीसी कौन बनेंगा महाकरोडपती की जानाब (जानिब) से २५ लाख रुपयोंकी लॉटरी लगी है. लॉटरी हासील करने के लिए निचे लिखे नंबरपर कॉन्टॅक्ट करे. ००९२३०३७७८३१०० नाम : विजयकुमार शर्मा
वो आपको आपका लॉटरी नंबर पुछेंगे तो आपका लॉटरी नंबर है...०१५०’
असा त्यात इंग्रजीत लिहिलेला मजकूर आहे. या लॉटरी नंबरच्या एका बाजूला केबीसीची मुद्रा आणि तिरंगा काढला असून, दुसऱ्या बाजूला अप्रूव्हडची मोहोर तसेच भारताची राजमुद्रा अंकित आहे. त्याखाली विविध मोबाईल सेल्युलर कंपन्यांचे लोगो आहेत.
व्हॉटस्अ‍ॅप इमेजसोबतच दुसरी एक आॅडिओ क्लीपही येते.

अशी आहे आॅडिओ क्लीप
हॅलो...
मै राजेशकुमार शर्मा
मुंबई कॉल सेंटरसे,
केबीसी डिपार्टमेंट की तरफसे,
कौन बनेंगा महाकरोडपतीसे बात कर रहा हूं
ये जो आपका नंबर है
इस नंबरको लॉटरी लगी है २५ लाख रुपये की
आपको और आपके
अगर आप को ये कॅश
कंपनीके सुपरवायझर विजयकुमार शर्मा
पंजाब नॅशनल बँक के मॅनेजर है वो आपको सारे डिटेल्स बतायेंगे
की आज आपको कौनसी बँक से २५ लाख का बिग अमाऊंट दिया जायेंगा...
उसका नंबर है. ००९२३०३७७८३१००
ये बँक मॅनेजरका नंबर है. ये आपका व्हॉटस्अ‍ॅपसे कॉलर नही लगेंगा. ये १४ अंकोका नंबर है. कॉम्प्युटर नंबर है...आपकी जानीमानी कॉल रिकॉर्ड की जायेंगी १४ कॉम्प्युटरपे. की आप २५ लाख के विजेता बात कर रहे है. आपके मोबाईलमे बॅलन्स नही हो तो ५० रुपये का पहिले रिचार्ज करवाईये. फिर बात करिये... फिरसे आपको एक बार बधाई...

Web Title: Fraud in the name of Kaun Banega Crorepati; New gang in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा