खासगी रुग्णालयात रुग्णांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:22+5:302021-04-09T04:09:22+5:30
कामठी : कामठी शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. रुग्णसंख्येत रोज वाढ होत आहे. शासनाच्यावतीने कामठी शहरातील ...
कामठी : कामठी शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. रुग्णसंख्येत रोज वाढ होत आहे. शासनाच्यावतीने कामठी शहरातील सहा खासगी रुग्णालयांना कोविड केंद्राची मान्यता दिली आहे. या कोविड केंद्रात कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सवा बिल आकारले जात असल्याचा आरोप कामठी तालुका सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे नियमबाह्य वसुली करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर कापसे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कामठी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल करताना नातेवाइकांना अॅडव्हान्स आधी जमा करावा लागतो. ज्या लोकांकडे वेळेवर पैसे नसताना अशांना उपचारापासून मुकावे लागत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.