नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:05+5:302021-06-26T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाकडून बापलेकांनी ७ लाख रुपये हडपले. बदल्यात त्याला बनावट नियुक्तीपत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाकडून बापलेकांनी ७ लाख रुपये हडपले. बदल्यात त्याला बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याची फसवणूक केली. लकडगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक शेषराव उके आणि गाैरव अशोक उके (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वाडीजवळच्या सुराबर्डी मार्गावर राहतात.
क्वेट्टा कॉलनी लकडगंजमध्ये राहणारे विक्रम दिलीप रतनानी (वय ३०) हे नोकरीच्या शोधात असताना त्यांना जानेवारी २०२० मध्ये उके बापलेकांनी गाठले. गाैरवने स्वताला कोटक महिंद्रा बँकेत नोकरीवर असल्याचे सांगून त्यांनी विक्रमला मॅनेजर म्हणून
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी २० जानेवारी २०२० ते १० फेब्रुवारी २०२१ दरम्यान सात लाख रुपये घेतले. विक्रमला त्यांनी ई मेलवर बनावट नियुक्तीपत्र पाठवले. ते घेऊन विक्रम संबंधित व्यवस्थापकांकडे गेला असता ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याने आपली रक्कम उके बापलेकाला परत मागितली. बरेच दिवस टाळाटाळ केल्यामुळे विक्रमने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----