नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:17 AM2020-07-18T00:17:27+5:302020-07-18T00:18:39+5:30

एअरपोर्टवर वाहन चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एक व्यक्तीची फसवणूक केली.

Fraud by showing job lure in Nagpur | नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एअरपोर्टवर वाहन चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एक व्यक्तीची फसवणूक केली. पीडित व्यक्ती (वय ३५) एमआयडीसी परिसरात राहते. ८ ते १३ जुलैच्या दरम्यान त्याला पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघींनी वेगवेगळ्या वेळी फोन करून एअरपोर्टवर ड्रायव्हरच्या पदासाठी तुमची निवड झाली, अशी थाप मारली. तुमची आयडी तयार करायचा आहे, असे सांगितले. त्या बदल्यात दोन हजार रुपये आपल्या खात्यात जमा करण्यास सांगितले. हे दोन हजार रुपये जमा केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला युनिफॉर्मकरिता ७६०० रुपये आणि नंतर इन्शुरन्स तसेच पोलीस व्हेरिफिकेशनसाठी १५ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी पुन्हा १२ हजार ५०० रुपये मागितले. रक्कम जमा केल्यानंतर आरोपी वेगवेगळे कारण सांगून वारंवार पैसे मागत असल्याची पीडितेला शंका आली. त्यामुळे त्यांनी एअरपोर्टवर संपर्क केला असता आरोपी पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघी त्याची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यावरून पीडित व्यक्तीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Fraud by showing job lure in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.