नाेकरीच्या नावावर तिघांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:27 AM2020-12-12T04:27:42+5:302020-12-12T04:27:42+5:30
कामठी : खासगी कंपनीमध्ये नाेकरी मिळवून देण्याची बतावणी करीत दाेन तरुणी व एका तरुणास ७४ हजार ५०० रुपयांनी गंडविल्याची ...
कामठी : खासगी कंपनीमध्ये नाेकरी मिळवून देण्याची बतावणी करीत दाेन तरुणी व एका तरुणास ७४ हजार ५०० रुपयांनी गंडविल्याची घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. या प्रकरणात पाेलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
आराेपींमध्ये शक्ती विनाेद बडाेळे (२२, रा. उमरेड), नितीन गनीराम तितरमारे (२३, रा. पारडी, ता. माेहाडी, जिल्हा भंडारा), निशिकांत मनाेहरजंगले (२१, रा. पारशिवनी), इम्तियाज आलम अब्दुल समद (२२, रा. जानपुरा, जिल्हा माेहरी, बिहार), माेहानी शिरकुरे, रा. पवनी, जिल्हा भंडारा, नितीन नंदनवार, रा. साकाेली, जिल्हा भंडारा, नीरज त्रिलाेचन पाेखरिया (२१, रा. येरखेडा, ता. कामठी), प्रेम दुर्गाप्रसाद शास्त्री (२९, नैनीताल, उत्तराखंड) या आठ जणांचा समावेश आहे. या आठही आराेपींनी येरखेडा, ता. कामठी येथे इंटरएशिया मार्केटिंग प्रा. लिमि. नामक कार्यालय सुरू केले हाेते.
या कार्यालयात नाेकरी लावून देण्याची बतावणी करीत त्यांनी रितू पांडुरंग कडवे (२३, रा. गाेकुळपेठ, नागपूर) हिच्याकडून ५२ हजार रुपये, अक्षय बावनकुळे याच्याकडून ११,५०० रुपये आणि श्रद्धा कराडे हिच्याकडून ११ हजार रुपये असे एकूण ७४ हजार ५०० रुपये घेतले हाेते. मात्र, त्यांनी या तिघांनाही नाेकरी दिली नाही. वारंवार मागणी करूनही त्यांना रक्कमही परत करण्यात आली नाही. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ४२०, १२० (ब) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताे एकाही आराेपीस अटक करण्यात आली नव्हती किंवा त्यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते.