साेयाबीनसह ट्रकच्या टायरची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:07+5:302021-09-04T04:12:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : ट्रकचालकासह अन्य एकाने ट्रकमधील २४.६० क्विंटल साेयाबीन आणि ट्रकच्या नऊ टायरची अफरातफर केल्याचा प्रकार ...

Fraud of truck tires with soybeans | साेयाबीनसह ट्रकच्या टायरची अफरातफर

साेयाबीनसह ट्रकच्या टायरची अफरातफर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : ट्रकचालकासह अन्य एकाने ट्रकमधील २४.६० क्विंटल साेयाबीन आणि ट्रकच्या नऊ टायरची अफरातफर केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. साहित्याची एकूण किंमत २ लाख ४५ हजार २८५ रुपये आहे.

श्रीजी ट्रान्सपाेर्टचे व्यवस्थापक नवीन मूलचंद ठाकूर (४२, रा. मारुती वाॅर्ड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा) यांनी एमएच-३२/एजे-६९७३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २९ टन ७८० किलाे साेयाबीन तळाेजा (रायगड) येथून काटाेल येथील कंपनीमध्ये पाठविले हाेते. त्या ट्रकमध्ये नवीन टायरदेखील हाेते. ट्रकचालक रिजवान खान व इंतजार जुम्मन दाेघेही ट्रकमध्ये साेयाबीनची पाेती घेऊन काटाेलच्या दिशेने निघाले.

हा ट्रक काटाेल येथे पाेहाेचताच त्यात २ लाख २८५ रुपये किमतीचे २४ क्विंटल ६० किलाे साेयाबीन आणि ४५ हजार रुपयांचे नऊ नवीन टायर कमी असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच नवीन ठाकूर यांनी ट्रकचालक रिजवान खान याला विचारणा केली. साेयाबीनची पाेती व टायर धावत्या ट्रकमधून खाली पडल्याचे त्याने सांगितले. मात्र, एवढ्या माेठ्या प्रमाणात साेयाबीन व टायर ट्रकमधून खाली पडणे शक्य नसल्याचे लक्षात येताच नवीन ठाकूर यांनी काटाेल पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी दाेघांविरुद्ध भादंवि ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक संताेष निंभाेरकर करीत आहेत.

.......

तीन टन सळाकी बेपत्ता

राजेश राधेश्याम सिंग (३७, पारसनाथ, उत्तर प्रदेश) यांनी एनएल-०१/एन-४५०६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये तीन टन लाेखंडी सळाकी उत्तर प्रदेशातून महालगाव, ता. कामठी येथील कंपनीत पाठविल्या हाेत्या. मात्र, या सळाकी कंपनीत पाेहाेचल्याच नाहीत. त्यामुळे राजेश सिंग यांनी माैदा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. या सळाकींची किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी माैदा पाेलिसांनी ट्रकचालक सच्चासिंग कलाेह, रा. विक्राेळी, मुंबई याच्या विराेधात भादंवि ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहेत.

Web Title: Fraud of truck tires with soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.