भूकेलेल्या गरजूंना मोफत जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:40 PM2021-05-17T22:40:41+5:302021-05-18T00:04:59+5:30
देवळा : गरजूंना मदतीचा हात देण्याची आजोबांची परंपरा नातू जपत असून कोरोना काळातही आपल्या आजोबांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा खंडीत न होऊ देता ती नियमितपणे सुरू ठेवत नईम शेख यांनी पुढे केलेला गरजूंना मदतीचा हात आज अनेक भुकेल्यांना जीवदान देणारा ठरत आहे.
देवळा : गरजूंना मदतीचा हात देण्याची आजोबांची परंपरा नातू जपत असून कोरोना काळातही आपल्या आजोबांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा खंडीत न होऊ देता ती नियमितपणे सुरू ठेवत नईम शेख यांनी पुढे केलेला गरजूंना मदतीचा हात आज अनेक भुकेल्यांना जीवदान देणारा ठरत आहे.
स्व.अमीर शेख यांनी १९७५ साली देवळा शहरात पहिली खानावळ सुरू केली. भरपेट व स्वस्त जेवण देणारी शेख खानावळ अशी ओळख, खानावळीत येणाऱ्या एखाद्याकडे पैसे कमी असले तरी तो जेवण करुनच बाहेर पडत असत.
अमीर शेख यांच्या निधनानंतर हि अन्नदानाची परंपरा हाजी सगीर शेख, व त्यांचे बंधु यांनी पुढे सुरू ठेवली. सद्या नईम शेख हे खानावळ चालवतात. रात्री हॉटेलवर कोणी गरीब आल्यास त्याला विनामुल्य जेवण देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे.
कोरोनाच्या संचार बंदी काळात व लॉकडाऊनमुळे अनेकांना अन्नासाठी वणवण करावे लागत आहे. हे पाहून नईम शेख यांनी गरजूंना मदतीचा हात या उपक्रमाखाली देवळा शहरातील पाच कंदील, दुर्गा माता मंदिर, तसेच बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी गरजूंचा शोध घेऊन त्यांना पाण्याची बाटली, व जेवण देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे अनेक गरीब, गरजूंच्या पोटात रोज चार घास जावू लागले आहेत.
कोरोनामुळे अनुभवलेल्या या सध्याच्या बिकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी. ोवेगवेगळ्या परीस्थितीत अनेकजण उपाशीपोटी झोपत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासाठी काही करावे ह्या भावनेतून गरजूंना मदतीचा हात हा उपक्रम सुरू केला असून गावात कोणी उपाशी राहू नये यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. दररोज दहा ते पंधरा व्यक्तिंच्या जेवणाची सोय करित आहे.
- नईम शेख, खानावळ मालक, देवळा.