स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र रखडलेलेच !

By admin | Published: July 21, 2016 11:32 PM2016-07-21T23:32:50+5:302016-07-21T23:32:50+5:30

कृषी विद्यापीठाने पाठवलेला प्रस्ताव, एमसीईएआरने पारित केला मात्र शासन दरबारी दुर्लक्ष.

Free Saltwater Research Center | स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र रखडलेलेच !

स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र रखडलेलेच !

Next

अकोला: विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषद (एमसीईएआर) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) पाठवलेला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने त्यांच्या सभेत हा प्रस्ताव (एमसीईएआर) पारित करू न राज्य शासनाला सादर केला आहे. विदर्भातील शेतकर्‍यांसाठी मैलाचा दगड ठरणारे संशोधन केंद्र मात्र शासन दरबारी रखडले आहे. या पावसाळी अधिवेशनात हे संशोधन केंद्र मिळेल का, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्टय़ात येतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्यांचा आत आहे. या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, भूजल खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम तर होतोच, मानवी आरोग्याला हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे.
दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्टय़ावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव एमसीईएआर व आयसीएआरकडे पाठविलेला आहे. एमसीईएआरच्या सभेत स्वतंत्र खारपाणपट्टय़ाचा प्रस्ताव परित करण्यात येऊन राज्य शासनाला सादर करण्यात आला; परंतु राज्य शासनाने अद्याप लक्ष घातले नाही. या पावसाळी अधिवेशनात खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राला मान्यता मिळावी याकरिता या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

***
 कृषी विद्यापीठाने पाठवलेला खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने पारित करू न शासनाकडे पाठवलेला आहे. खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी संशोधन केंद्र मागितले आहे.
- डॉ. डी. एम.मानकर,
संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Free Saltwater Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.