कोविड जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:13 PM2020-08-18T12:13:26+5:302020-08-18T12:15:17+5:30
कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले.
शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. अतिरिक्त शिक्षकांनाही शाळेत बोलावून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
शिक्षक परिषदेने शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. या मागणीला यश आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्यवाह योगेश बन यांनी दिली.