८० नागरिकांवर माेफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:18+5:302021-08-01T04:08:18+5:30
हिंगणा : उज्ज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गजानननगर, हिंगणा येथे शुक्रवारी (दि. ३०) राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...
हिंगणा : उज्ज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गजानननगर, हिंगणा येथे शुक्रवारी (दि. ३०) राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ८० नागरिकांच्या आराेग्याची माेफत तपासणी करण्यात आली असून, त्यांना आराेग्याची काेराेनापश्चात काळजी कशी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात काेराेनापश्चात आजार, दमा, ॲलर्जी, सीओपीडी, छातीचे आजार, क्षयरोग या आजारांची तपासणी करून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या नि:शुल्क शिबिराचा परिसरातील ८० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. प्रसन्न मून, डॉ. शीतल उमरे, डॉ. अविनाश रिनाइत, डॉ. रमेश पाटील आदींनी रुग्ण तपासणी कार्यात सेवा प्रदान केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी भूपेंद्र हरिणखेडे, विष्णू चौधरी, पूजा ताजने, अचल मिश्रा यांच्यासह डाॅ. उमरे हाॅस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.