लता मंगेशकर रुग्णालयात महिनाभर निःशुल्क उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:34+5:302021-06-09T04:08:34+5:30

मधुमेह व लठ्ठपणा नियंत्रण शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डिगडोह हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ३१ जुलै ...

Free treatment for a month at Lata Mangeshkar Hospital | लता मंगेशकर रुग्णालयात महिनाभर निःशुल्क उपचार

लता मंगेशकर रुग्णालयात महिनाभर निःशुल्क उपचार

googlenewsNext

मधुमेह व लठ्ठपणा नियंत्रण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डिगडोह हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ३१ जुलै २०२१ पर्यंत रुग्णालयातील सर्वच विभागातील जनरल वाॅर्डमध्ये भरती रुग्णांवर निःशुल्क उपचार व ऑपरेशन करण्यात येणार आहे.

हे वर्ष रुग्णालयातर्फे माजी मंत्री रणजित देशमुख अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत, ७ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत कोणत्याही विभागातील जनरल वाॅर्डमध्ये भरती झालेल्या सर्वच वयोगटातील रुग्णांना कुठलाही खर्च लागणार नाही. दररोज दोनवेळा नि:शुल्क भोजनसुद्धा मिळेल. या कालावधीत ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचीसुद्धा नि:शुल्क नोंदणी केली जाईल.

सोबतच, कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी जवळपास सर्वच विभागातील विशेषज्ञांद्वारे विशेष तपासणी व मार्गदर्शनासाठी नि:शुल्क ओपीडी सुरू आहे. मेडिसिन ओपीडीमध्ये ३० जूनपर्यंत सुरू असलेल्या नि:शुल्क मधुमेह व लठ्ठपणा नियंत्रण शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: Free treatment for a month at Lata Mangeshkar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.