एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:45 AM2018-07-14T01:45:52+5:302018-07-14T01:47:32+5:30
वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अभियंत्यांची चमू एमआरओमध्ये येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अभियंत्यांची चमू एमआरओमध्ये येत आहे.
इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान एटीआर-७२ आहे. टर्बो प्रॉप इंजिनचे विमान २६ मे रोजी वादळामुळे क्षतिग्रस्त झाले. विमानाचे डावे विंग नादुरुस्त झाले आहे. याच कारणामुळे हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अॅप्रॉनमध्ये उभे आहे. मिहान येथील एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसाठी युरोपियन अभियंत्यांच्या चमूला एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची (एआयईएसएल) चमू सहकार्य करणार आहे. विमान १६ जुलैला एमआरओमध्ये आणण्यात येणार असून दुरुस्तीसाठी फ्रान्सची चमू १८ जुलैला नागपुरात पोहोचत आहे. दुरुस्तीचे काम एक महिना चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
एमआरओमध्ये नवीन कंपनीची भर
एमआरओचे संचालन करणारी कंपनी एआयईएएलच्या सूत्रांनुसार दुसºया कंपनीचे विमान पहिल्यांदा एमआरओमध्ये येत आहे. एवढेच नव्हे तर विदेशी चमूही दुरुस्तीसाठी येत आहे. एमआरओमध्ये विमानाच्या दुरुस्तीसाठी हँगर देण्यात येणार आहे. यामुळे एआयईएसएलला विमानाच्या पार्किंगमुळे आवक होणार आहे.