मैत्री, प्रेम नव्हे नुसताच धोका !

By admin | Published: February 29, 2016 02:48 AM2016-02-29T02:48:10+5:302016-02-29T02:48:10+5:30

त्यांचे वय तसे शाळकरीच. सरळमार्गी चालत वर्गात जायचे....दिवसभर वर्ग करायचे...संध्याकाळी घरी परतायचे अन् तुळशीसमोर दिवा लावला की अभ्यासाला बसायचे.

Friendship, not just love, at risk! | मैत्री, प्रेम नव्हे नुसताच धोका !

मैत्री, प्रेम नव्हे नुसताच धोका !

Next

रात्रभर चालला विकृत खेळ : मुलींच्या संमतीने सारेच थक्क
नरेश डोंगरे  नागपूर
त्यांचे वय तसे शाळकरीच. सरळमार्गी चालत वर्गात जायचे....दिवसभर वर्ग करायचे...संध्याकाळी घरी परतायचे अन् तुळशीसमोर दिवा लावला की अभ्यासाला बसायचे. पण, त्या तिघींचा दिनक्रम अचानक बदलला आणि पुढचे सारेच आक्रित घडत गेले. पोलिसांनी आता जरी सामूहिक बलात्काराच्या दिशेने तपास सुरू केला असला तरी या लज्जास्पद कथेचे न उलगडलेले कंगोरे नजरेआड करता येणार नाही. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही तर वयात येऊ पाहणाऱ्या शाळकरी मुलांच्या मनात अवेळी निर्माण होणाऱ्या लैंगिक भावना त्यांना कुठल्या मार्गावर नेत आहेत याचा विचार करायला लावणारे दाहक उदाहरण आहे. ही मुले याला मैत्री, प्रेम असे कुठलेही गोजिरवाणे नाव देत असले तरी हा स्वत:शी व आपल्या पालकांच्या विश्वासाशी केलेला शुद्ध धोकाच आहे.
शाळा संपल्यानंतर १४ ते १६ वर्षे वयोगटातील तीन शाळकरी मुली घरी येऊन छान तयारी करतात. अन् त्यांच्या पाच मित्रांसोबत रात्रभर निर्जन ठिकाणी राहतात. भल्या सकाळी काहीच घडले नसल्याच्या अविर्भावात घरी पोहचतात. एकीची तिचे आईवडील झाडाझडती घेतात अन् तिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना उजेडात येते. या घटनेच्या निमित्ताने ही अल्पवयीन मुले काय करीत आहे, त्याचेही ओंगळवाणे रूप उजेडात येते.
सामूहिक बलात्काराच्या या घटनेचे ‘वास्तव‘ उघडकीस आल्यानंतर चौकशी करणारे पोलीसही स्तंभित झाले आहेत. कारण अल्पवयीन मुली, मुले अशा प्रकारच्या मर्यादा ओलांडतानाच कुकृत्य लपविण्यासाठी सराईत गुन्हेगाराला लाजविणारी लपवाछपवीही करीत असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. या घटनेशी संबंधित केवळ पाच आरोपी अन् एक पीडित नाही. तर, तीन मैत्रिणी अन् त्यांचे पाच मित्र असे एकूण आठ जण जुळलेले आहेत. सर्वांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती हातावर आणून पानावर खाण्यासारखी आहे.
मात्र, आठही जणांचा निर्ढावलेपणा कमालीचा संतापजनक आहे. गुरुवारी आईवडिलांना कसलीही माहिती न देता अगदी प्लॅनिंगप्रमाणे हे सर्व आपापल्या घरून बाहेर पडले. शाळा संपल्यानंतर एकीने दुसरीच्या घरी जाऊन सायंकाळी ६.४५ ला तिला सोबत घेतले. रस्त्यात मनीष नामक मित्र तयार होताच! ते तिघे ७ वाजता चांदमारी गार्डनमध्ये गेले. तेथे मनीषने फोन करून ७.३० ला फारुखला बोलावून घेतले.
पाठोपाठ तेथे पुन्हा एक मैत्रीण आली. तीन मैत्रिणी अन् दोन मित्र एका लॉनमध्ये जाऊन बसले. ९ च्या सुमारास तेथे पुन्हा राहुल नामक मित्र आला. त्यांचे तेथे नको ते चाळे सुरू झाले. ठरल्याप्रमाणे नंतर तेथे राहुलचे मित्र अमोल आणि प्रफुल्ल आले. राहुल हा कॉमन फ्रेण्ड होता. त्यामुळे इतर तिघींनी त्याच्यासोबत त्याच्या अनोळखी मित्रांनाही कसला आक्षेप घेतला नाही. मध्यरात्री हे सर्व दुसऱ्या एका लॉनजवळ गेले. तेथे पहाटे २.३० वाजेपर्यंत तीन मुली आणि पाच मुले असा नको तो कार्यक्रम चालला. त्यानंतर २.४५च्या सुमारास एक मुलगी वाठोडा चौकातून बिनधास्तपणे घरी निघून गेली. दरम्यान, पीडित मुलगी आपल्यासोबतच दुसऱ्या मुलांशीही लज्जास्पद वर्तन करीत असल्याचे बघून तिचा मित्र मनीष तिच्यावर संतापला. ‘तुझ्या वडिलांना हे सर्व सांगतो’, अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर दोन मुली अन् तीन मुले उरली. एक मैत्रीण तिच्या मित्रासोबत दुसरीकडे गेली. तर, राहुल आणि अमोल एका पडक्या घरात या शाळकरी मुलीसोबत गेले.

अळीमिळी गुपचिळी
हे एवढे सर्व आटोपल्यानंतर ठरल्याप्रमाणे कुणी, कुणाकडे वाच्यता केली नाही. आळीमिळी गुपचिळीचा प्रकार तब्बल २४ तास अंधारात राहिला. मात्र, मुलीला असह्य त्रास सुरू झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आईच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतरही मुलगी भलतीच माहिती देत होती. संतप्त आईने बदडल्यामुळे तिने झालेला प्रकार सांगितला.त्यानंतर प्रकरण शुक्रवारी ठाण्यात पोहचले. तेथेही बनवाबनवी सुरूच होती. परंतु, पोलिसांनी तिच्याकडून पद्धतशीर घटनाक्रम उलगडून घेतला अन् गुन्हा दाखल केला.
त्या दोघींचे काय ?
हिचे प्रकरण अखेर पोलिसांत पोहचले. सर्वत्र बोभाटा झाला. मात्र, ‘हिच्यासारखाच’ गैरप्रकार करणाऱ्या त्या दोघी अजूनही गप्पच आहेत. त्यांनी इतरांनाच काय, आईवडिलांनाही या लज्जास्पद प्रकाराची हवा लागू दिली नाही. त्यांचा निगरगट्टपणा अन् मित्रांना वाचविण्यासाठी एकावर एक खोटे बोलण्याची शैली पोलिसांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.

Web Title: Friendship, not just love, at risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.