मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी सर्व जबाबदारी महिलांवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:25 IST2024-04-19T11:36:04+5:302024-04-19T12:25:20+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महिलांची भागीदारी, केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी महिलांनी सर्व जबाबदाऱ्या पाडल्या पार

मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी सर्व जबाबदारी महिलांवरच
नागपूर : जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १२ महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे. यापैकी नागपूर ग्रामिण मधील मार्डन स्कुल बुथ क्रमांक ४१ हे केंद्र गुलाबी मतदान केंद्र हाेते. या मतदान केंद्रांचे सर्व संचालन हे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात हाेते. भूमी अभिलेख उपाधीक्षक डॉ. सारिका कडू या हिंगणा झाेन ४ साठी झाेनल ऑफिसर हाेत्या या केंद्राधिकारी म्हणून रूपाली देव यांनी जाबाबदारी सांभाळली. या केंद्रासमाेर मतदारांच्या स्वागतासाठी रांगाेळी काढण्यात आली हाेती. संपूर्ण केंद्र गुलाबी फुगे व रंगानी सजविलेले हाेते.