बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:28+5:302021-09-18T04:10:28+5:30
श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड ...
श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : सततचा पाऊस, पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे व वातावरणातील आर्द्रता यामुळे नरखेड माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या राेगांमुळे झाडांची फळे पटापट गळत असल्याने तालुक्यातील माेसंबी बागायतदार हवालदिल झाले आहेत.
नरखेड तालुक्यात एकूण ४,०८७ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा आहेत. यातील बहुतांश बागांमध्ये ही फळगळ आढळून आली आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्याचा जमिनीत याेग्य निचरा हाेत नाही. शिवाय वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीला पाेषक वातावरण मिळाल्याने बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.
फळगळ होण्यामागे आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडींमध्ये अडथळा निर्माण हाेताे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. झाडांचे याेग्य पोषण न झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी सांगितले. सध्या ब्राऊन रॉट प्रकारची फळगळ सुरू आहे. फायटोप्थोरा या बुरशीमुळे ही फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात हिरव्या फळांवर तपकिरी, करडे डाग तयार हाेतात. त्यामुळे फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. संक्रमणामुळे फळगळतीला सुरुवात झाली असून, या अवस्थेला ब्राऊन रॉट असे संबोधतात. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात फोफावताे, असेही डाॅ. याेगीराज जुमडे यांनी स्पष्ट केले.
...
फळगळतीचे चार प्रकार
झाडाला क्षमतेपेक्षा अधिक फळ असणे हे फळगळतीचे नैसर्गिक करण आहे. यासाठी झाडांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.एका झाडाची क्षमता ८०० ते १,००० फळांची आहे. वातावरणातील बदल, फळमाशी व पतंगाच्या डंखामुळे कीड लागून फळगळती होते. जमिनीतील आर्द्रता वाढल्याने बुरशी तयार होते. फळाच्या देठांवर पावसाचे पाणी राहिल्याने तेथे बुरशी निर्माण होऊन फळगळती होते. कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीजन्य राेगांमुळे फळगळ हाेते, अशी माहिती डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली.
...