बुरशीजन्य राेगामुळे माेसंबीची फळगळती - जाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:17+5:302021-09-18T04:10:17+5:30
मोसंबीच्या झाडाला प्रत्येकी एक किलाे डीएपी व १५० ग्रॅम सूक्ष्म मूलद्रव्य द्यावे. सलग तीन ते चार दिवस पाऊस असल्यास ...
मोसंबीच्या झाडाला प्रत्येकी एक किलाे डीएपी व १५० ग्रॅम सूक्ष्म मूलद्रव्य द्यावे. सलग तीन ते चार दिवस पाऊस असल्यास १.५ ग्रॅम जीए-३, १.५ किलाे कॅल्शिअम नायट्रेट व १५ ग्राम स्ट्रेप्टोसायक्लीन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. १५ दिवसांनी टू-फाेर डी किंवा १.५ ग्रॅम एनएए, ३०० ग्रॅम बोरिक ॲसिड, थिओफानेट मेथील किंवा १०० ग्राम कार्बाेडाक्झिम, १.५ किलाे ००:५२:३४ मोनोपोटसीएम फॉस्फेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर सलग तीन-चार दिवस पाऊस आल्यास २.५ ग्रॅम फोसेटील-एएल प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास दुसरी फवारणी मेटालॅकक्सिल, मानकोझेब (रेडोमिल गोल्ड) ही बुरशीनाशके २.५ ग्राम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी सूचना उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगिराज जुमडे यांनी केली.
...
शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. ऑगस्टमध्ये कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले. हेच मार्गदर्शन मार्च-एप्रिलमध्ये केले असते, तर फळगळती झाली नसती. शेतकऱ्यांनी या रोगावर तात्पुरता स्थायी उपाय केले असते.
-वसंत चांडक,
मोसंबी उत्पादक, जामगाव
...
हवामान खात्याचा सततच्या पावसाबाबत अंदाज व त्यानुसार कृषी विभागाने वेळेवर मार्गदर्शन करायला पाहिजे होते. मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. यावर काय उपाययोजना करावी हे कळेनासे झाले आहे.
-चंदू पावडे,
मोसंबी उत्पादक, जामगाव
...
या राेगामुळे झाडांची ५० टक्के फळे गळाली आहेत. यातून माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
-सुनील वर्मा,
मोसंबी उत्पादक, उमठा