इंधनामुळे होईल सहा हजार कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:38+5:302021-07-07T04:09:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या दिशेने पावले उचलणे सुरू झाल्याने रिफायनरी स्थापन होण्याचा मार्ग जवळपास बंद ...

Fuel will save Rs 6,000 crore | इंधनामुळे होईल सहा हजार कोटींची बचत

इंधनामुळे होईल सहा हजार कोटींची बचत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या दिशेने पावले उचलणे सुरू झाल्याने रिफायनरी स्थापन होण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. परंतु रिफायनरीचे समर्थन करणारे तज्ज्ञ अद्यापही निराश झालेले नाहीत. जर विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह रिफायनरीदेखील आली तर औद्योगिक विकासाला गती मिळेल. शिवाय इंधनातूनच सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत नागपुरात स्थित पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोमध्ये इंधन येत आहे. रिफायनरी बनली तर पाईपलाईनच्या माध्यमातून क्रूड ऑईल येईल. सध्या रिफायनरीतून इंधन आणण्यासाठी प्रतिलिटर जवळपास चार रुपयांचा खर्च होत आहे. पाईपलाईनमधून क्रूड ऑईल आणले तर हा खर्च ३० पैसे प्रतिलिटर होईल. रिफायनरीतून येणाऱ्या सहा कोटी टन क्रूड ऑईलमध्ये ३० टक्के इंधनाचे उत्पादन होईल. याचप्रकारे मध्य भारतातील जबलपूर, रायपूरसारख्या शहरांत पाईपलाईन टाकून पेट्रोलियम उत्पादनांचा वाहतूक खर्च वाचविला जाऊ शकतो. मुंबई-मनमाडमध्ये हा प्रकार यशस्वी झाला आहे. या पूर्ण प्रक्रियेत आताच्या तुलनेत सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

याचप्रकारे क्रूड ऑईलच्या ४० टक्के भागातून पेट्रोकेमिकल उत्पादन तयार होतील. कृषी, औषधी, फर्निचर, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल उद्योगाला याचा फायदा होईल. विदर्भात या क्षेत्राशी जुळलेले उद्योग येतील. याचप्रमाणे क्रूड ऑईलच्या उरलेल्या घटकांपासून पेट कोक तयार होईल. त्याचा उपयोग डांबराच्या रूपात होऊ शकेल.

रिफायनरीचे इतर फायदे

-रिफायनरीला पाणी दिल्याने मनपाचे उत्पन्न वाढेल.

-रिफायनरी १०० कोटी खर्च करून विदर्भातील बांध स्वच्छ करून पाणी संग्रह क्षमता वाढवेल. विदर्भ सिंचन विकास महामंडळाला फायदा होईल.

-समृद्धी महामार्गाच्या बाजूने पाईपलाईन टाकल्यावर एमएसआरडीसीला ५० पैसे प्रतिलिटरच्या दराने भाडे मिळेल. महामार्ग बांधणीसाठी घेण्यात आलेले कर्ज पाच वर्षांत संपेल.

-ग्रीन रिफायनरी असल्याने यातून निघणाऱ्या सल्फर वगैरेचा उपयोग खत बनविण्यासाठी होईल.

-रिफायनरीच्या जवळपास कृषी, औषध, फर्निचर, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.

विदर्भात येईल औद्योगिक क्रांती

रिफायनरी आल्यानंतर विदर्भात औद्योगिक क्रांती येईल. पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रित होतील. सोबतच इतर उद्योगांना देखील याचा फायदा होईल. एमआयडीसी व मिहानमध्ये रिकाम्या पडलेल्या भूखंडांची मागणी वाढेल, असे मत रिफायरनरी-पेट्रोकेमिकल क्षेत्राचे तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

Web Title: Fuel will save Rs 6,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.