फुके यांचा पटोलेंवर ट्विटर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 09:03 PM2021-02-11T21:03:17+5:302021-02-11T21:05:29+5:30

Fuke's Twitter attack काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दाखवीत पटोले यांच्यावर ट्विटरवर हल्ला चढविला आहे. पटोले यांची टीका ही विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी असल्याचा प्रहार फुके यांनी केला आहे.

Fuke's Twitter attack on Patole | फुके यांचा पटोलेंवर ट्विटर हल्ला

फुके यांचा पटोलेंवर ट्विटर हल्ला

Next
ठळक मुद्देभाजप नेत्यांवरील आरोपांना दिले ‘भक्ती’भावाने उत्तर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दाखवीत पटोले यांच्यावर ट्विटरवर हल्ला चढविला आहे. पटोले यांची टीका ही विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी असल्याचा प्रहार फुके यांनी केला आहे.
फडणवीस यांना विदर्भात रोखण्यासाठी पटोले यांच्या हाती काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली, अशी राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. आता पटोले यांना गुंतवून ठेवण्यासाठी ते ज्या साकोली विधानसभा मतदारसंघातून येतात तेथून गेल्यावेळी भाजपकडून लढलेले आ. परिणय 
फुके यांना समोर करण्यात आले 
आहे. गेल्या निवडणुकीत फुके यांचा पटोले यांनी पराभव केला होता. मात्र ही निवडणूक दोन्ही नेत्यांतील संघर्षाने चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे पटोले हे भाजपमध्ये असताना गोंदिया- भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत फुके यांना विजयी करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. मात्र, पटोलेंनी नंतर पक्ष बदलला आणि या दोन्ही नेत्यांमधील संबंधही तुटेपर्यंत ताणले गेले. पटोले यांनी भाजप नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपले घर दुरुस्त करावे, त्यांच्या निवडीने नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांची आधी समजूत काढावी, 
असा डिवचणारा सल्लाही फुके यांनी दिला आहे. तर, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले हे येत्या 
काळात भंडारा- गोंदियात शक्तिप्रदर्शन करून गृहजिल्ह्यात भाजपवर अधिक दबाव निर्माण करण्याच्या 
बेतात आहेत.

Web Title: Fuke's Twitter attack on Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.