संस्कारक्षम पिढी घडविण्यात ‘लोकमत’ची मौलिक भूमिका

By admin | Published: January 11, 2015 12:48 AM2015-01-11T00:48:25+5:302015-01-11T00:48:25+5:30

आजच्या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र मोलाची भूमिका पार पाडत आहे. संस्काराचे मोती, जंगल सफारी अशा स्पर्धांमुळे सुसंस्कृत विद्यार्थी घडतात,

The fundamental role of 'Lokmat' to create an impressive generation | संस्कारक्षम पिढी घडविण्यात ‘लोकमत’ची मौलिक भूमिका

संस्कारक्षम पिढी घडविण्यात ‘लोकमत’ची मौलिक भूमिका

Next

चंद्रशेखर बावनकुळे : संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण
कामठी : आजच्या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र मोलाची भूमिका पार पाडत आहे. संस्काराचे मोती, जंगल सफारी अशा स्पर्धांमुळे सुसंस्कृत विद्यार्थी घडतात, असे मत ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल येथे लोकमततर्फे राबविण्यात आलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. यादवराव भोयर, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, नगर परिषद उपाध्यक्ष रणजित सफेलकर, तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार वरपे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, संचालक अनुराग भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, प्राचार्य प्रिया अतकरे, विवेक मंगतानी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, राज्य शासनाकडून व्यवसायाभिमुख अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उभारण्यास उत्तम संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतच्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. स्पर्धेत पूर्वी पुरुषोत्तम पोटभरे (प्रथम), अंजली अविनाश मेश्राम (द्वितीय), असित सुखदेव (तृतीय) तसेच १२ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक सुदाम राखडे यांनी केले. संचालन संगीता उपाध्याय यांनी तर आभार प्राचार्य प्रिया अतकरे यांनी मानले. कार्यक्रमास पुष्पा पिल्ले, सीमा गडकरी, प्रीती चिखलकर, विशाखा घाटे, अविनाश धोटे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास नितीन रावेकर, उज्ज्वल रायबोले, संदीप कामळे, वाजीद अली, श्यामलाल शर्मा, राजेश गोलर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The fundamental role of 'Lokmat' to create an impressive generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.