रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी निधी द्या

By admin | Published: October 17, 2015 03:28 AM2015-10-17T03:28:23+5:302015-10-17T03:28:23+5:30

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा,

Funding for the damaged irrigation project | रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी निधी द्या

रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी निधी द्या

Next

जनमंचची मागणी : वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याशी केली चर्चा
नागपूर : विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जनमंचने केली आहे. जनमंचच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना निदान काही अंशी तरी दिलासा मिळावा म्हणून या विभागात रखडलेले सगळे सिंचन प्रकल्प ताबडतोब मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे.
तसे न झाल्यास हे प्रकल्प पुन्हा रखडत राहतील. म्हणून या विभागात रखडलेले सगळे सिंचन प्रकल्प ताबडतोब मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे.
तसे न झाल्यास हे प्रकल्प पुन्हा रखडतील. नवनवीन सुप्रमा सादर करून त्यांची किंमत वाढती ठेवण्याचे प्रयोग पुढेही सुरू राहतील आणि शेतकरी असहायपणे आत्महत्या करत राहतील, असे होऊ नये म्हणून सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
तसेच यापुढे तरी या निधीचा विनियोग पारदर्शक प्रकारे व्हावा, यासाठी सक्षम, निष्पक्ष व कठोर निगराणी यंत्रणा उभारावी, अशी विनंतीही करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Funding for the damaged irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.