‘तांडव’च्या वादापासून युवावर्ग फुर्रर्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:32+5:302021-01-20T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाद आणि प्रसार या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक अशाच आहेत. सिनेमांच्या बाबतीत ही पुरकता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाद आणि प्रसार या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक अशाच आहेत. सिनेमांच्या बाबतीत ही पुरकता अनुकूल असल्याचेच स्पष्ट होते. देशभरात नव्यानेच प्रदर्शित झालेली ‘तांडव’ ही बेवसिरिज त्यातील आक्षेपार्ह कन्टेन्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मात्र, युवावर्गाला आणि वेबसिरिजच्या शौकीनांना त्याचे फारसे सोयरसुतक दिसत नाही. या सिरिजची पायरेटेड कॉपी धडाक्यात व्हायरल होत असल्याचे दिसून येते.
मुळात पायरेसी हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याचा फटका जवळपास सर्वच चित्रपटांना बसलेला आहे. चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होताच, दुसऱ्याच दिवशी आणि कधीकधी तर सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच पायरेटेड कॉपी सर्वत्र प्रसारित होत असतात. बेकायदेशीर चाललेला हा मोठ्ठा व्यवसाय आहे. वेबसिरिजच्या बाबतीतही हेच दिसून येत आहे. बहुचर्चित ‘तांडव’ प्रदर्शित होताच त्यातील हिंदू देविदेवतांच्या विटंबनात्मक कन्टेन्टमुळे ही वेबसिरिज वादाच्या अडकली आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत आणि पोलिसी तक्रारींसोबतच न्यायालयातही हा मुद्दा गेला आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत युवावर्ग ही वेबसिरिज वेगवेगळ्या साइटवरून अपलोड करत असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा वाद यापूर्वी अनेक सिनेमे व वेबसिरिजवरून उपस्थित झाला होता. वाद वाढल्यानंतर पायरेटेड कॉपींचा प्रसारही तेवढ्याच जोमाने झाल्याचे दिसून आले, हे विशेष.