संपाचा संताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:46 AM2017-10-21T01:46:24+5:302017-10-21T01:46:36+5:30

एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे.

Fury of the strike! | संपाचा संताप!

संपाचा संताप!

Next
ठळक मुद्देसंप एसटीचा दिवाळी ट्रॅव्हल्सची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. गरिबांचा आधार असलेली एसटी चार दिवसांपासून बंद असल्याने मामाच्या गावी जायचे कसे, असा प्रश्न बच्चे कंपनीकडून विचारला जातो आहे. ऐन भाऊबीजेच्या तोंडावर भावाच्या गावी जातांना संपाचे विघ्न आल्याने बहिणींचाही हिरमोड झाला आहे.

दरम्यान कर्मचाºयांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने चौथ्या दिवशीही संप कायम आहे. या संपामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास एका दिवशी विभागाला ५५ लाखाचे उत्पन्न आहे. चार दिवसात २ कोटी २० लाखाचे उत्पन्न बुडाले. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत.
संपामुळे नागपूर विभागात असलेल्या ५७० एसटीची चाके थांबली आहेत तर ३१०० कर्मचारी संपात सहभागी आहेत. एसटी दररोज २१ लाख किमीचा प्रवास करते. एसटीची चाके थांबल्याने हा प्रवास खोळंबला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या राज्यव्यापी बेमुदत संपाला नागपुरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. गणेशपेठ बस स्थानकासह विविध एसटी बस स्थानकांवर सामसूम आहे. दुसरीकडे खासगी बसस्थानकांवर मात्र प्रवाशांची चांगलीच गर्दी आहे. याचा फायदा खासगी बस चालक घेत आहेत. दुप्पट तिप्पट भाडे आकारले जात आहे. 
गावाकडे कसे जाणार?
‘सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी सिंदेवानी जि. छिंदवाडावरून खासगी बसने नागपुरात आलो. येथे आल्यानंतर रुग्णालयही बंद असल्यामुळे नाईलाज झाला. आता एसटी बसेसही बंद असल्याचे समजले. त्यामुळे गावाकडे कसे परत जाणार हा प्रश्न पडला आहे.’
-भोजराज शेंडे, सिंदेवानी, जि. छिंदवाडा

‘एसटीच्या संघटनांनी पुकारलेला संप लवकरच संपण्याची अपेक्षा आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळाने आधीच ज्यादा गाड्यांचे नियोजन केले होते. संप मिटल्यास त्यावर त्वरित अंमलबजावणी करू. खासगी बसेसकडून यापूर्वीही प्रवाशांकडून अधिक भाडे आकारून त्यांची लूट होत होती. संपाच्या काळात ही लूट आणखीनच वाढली आणि प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागले. प्रवाशांना खासगी बसेसचा या काळात अतिशय वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटी महामंडळावरील विश्वास आणखी वाढणार आहे.’
-सुधीर पंचभाई,
विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

Web Title: Fury of the strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.