नागपुरात जल्लोषाच्या नादात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:07 PM2020-11-12T13:07:07+5:302020-11-12T13:09:16+5:30
BJP Nagpur News कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजपा आमदार, खासदारांसह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजपा आमदार, खासदारांसह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.
बिहार निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बुधवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गणेशपेठ मध्ये जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाची कुठलीही परवानगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून घेतली नाही. गर्दी जमविण्यास मनाई असताना भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमविली. सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी भाजपा शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, खासदार विकास महात्मे, त्याचप्रमाणे संजय जाधव, प्रमोद चिखले, सुनील गिरडकर, संजय चावरे, प्रमोद बेले, बंटी कुकडे, रामराव पाटील, दीपक मोहिते, शिवानी दाणी, अमृता येललकर, अनिता कासेकर, पूजा पाटील, निकिता पराये, नीरजा पाटील आणि इतर ४० ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे सहकलम ३ आणि साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ अन्वये गुन्हा नोंदविला.