फुटाळा-अंबाझरी तलाव सौंदर्यीकरण प्रकल्प तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:54 PM2018-07-05T22:54:17+5:302018-07-05T22:55:05+5:30

शहरातील फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या १२ विभागांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असून, तात्काळ या विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

Futala-Ambazari lakes beautification projects give an emergency no objection certificate | फुटाळा-अंबाझरी तलाव सौंदर्यीकरण प्रकल्प तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र द्या

फुटाळा-अंबाझरी तलाव सौंदर्यीकरण प्रकल्प तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र द्या

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ विभागांना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांचे  निर्देश


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरातील फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या १२ विभागांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असून, तात्काळ या विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
हैदराबाद हाऊस येथे पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विभागांना तात्काळ या प्रकल्पासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट साऊंड व लेझर मल्टीमीडिया शो तसेच अंबाझरी उद्यान येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट साऊड व लेझर मल्टीमीडिया प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. या प्रस्तावात पाच वर्षासाठी कार्यान्वयन, व्यवस्थापन, संचालन, देखभाल-दुरुस्ती याचा प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाला १८ मीटर डीपी रस्त्याच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाला १८ मीटर डीपी रस्त्यााचे बांधकाम आणि पार्किंग, वीज उपकेंद्र्र्र व पायाभूत सुविधांसाठी जागा उपलब्ध करून नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे. महापालिकेला फुटाळा येथे रस्ता व तलावात गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यायची आहे. तसेच तलावात कचरा टाकला जाऊ नये याची व्यवस्था करायची आहे. महावितरणला फुटाळा परिसरात विजेचे उपकेंद्र व उच्चदाब वाहिनी उभारणी करून द्यायची आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला अंबाझरीच्या प्रकल्पासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे असून लाईट, साऊंड व मल्टीमीडिया शो उभारण्यासाठ़ी नाहरकत प्रमाणपत्र त्वरित द्यायचे आहे. पोलीस विभागाला आपले नाहरकत प्रमाणपत्र लगेच देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन विभाग यांनीही नाहरकत प्रमाणपत्र लगेच देण्याचे मान्य केले आहे. वायुसेना विभागाने लेझर शो वगळता अन्य बाबींसाठी लगेच नाहरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भुयारी रस्ता व प्रेक्षक दीर्घाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत निधी उपलब्ध करून देणार आहे.

Web Title: Futala-Ambazari lakes beautification projects give an emergency no objection certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.