भावी वधूवर बलात्कार

By admin | Published: May 9, 2015 02:28 AM2015-05-09T02:28:35+5:302015-05-09T02:28:35+5:30

लग्न तोडण्याची धमकी देऊन भावी वधूशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने हुंड्याचे कारण पुढे करून लग्न मोडले.

Future Bride Rape | भावी वधूवर बलात्कार

भावी वधूवर बलात्कार

Next

नागपूर : लग्न तोडण्याची धमकी देऊन भावी वधूशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने हुंड्याचे कारण पुढे करून लग्न मोडले. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी योगेश दामोधर देव्हारे (वय ३१) आणि प्रदीप दामोधर देव्हारे (वय ४०) या दोघांवर गुन्हे दाखल केले. आरोपी सावनेर येथील नागमंदिराजवळ राहतात.
कोतवालीतील एका तरुणी (वय २८) सोबत योगेशचे लग्न जुळले होते. साक्षगंध झाल्यानंतर आरोपी योगेश वारंवार तिला फिरायला नेऊ लागला. लग्न होणार असल्यामुळे तरुणीसोबत घरच्यांचाही त्याला विरोध नव्हता. १५ फेब्रुवारीला आरोपीने एका ओळखीच्या महिलेच्या घरी तिला नेले. तो तेथे तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. तिने नकार देताच त्याने लग्न मोडण्याची धमकी दिली. कुटुंबीयांची प्रतिष्ठा लक्षात घेत तरुणीने त्यावेळी त्याची मागणी मान्य केली. यानंतर योगेश वेळोवेळी नागपुरात येऊन तिला बाहेर नेत होता आणि तिच्याशी शरीरसंबंध जोडत होता. १२ एप्रिलला त्याने असाच प्रकार केला. तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने आणि त्याचा भाऊ प्रदीप याने तरुणीच्या आईवडीलांकडे हुंड्याखातर ५ लाख रुपये आणि मौल्यवान चिजवस्तूंची मागणी केली. ती पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यामुळे आरोपीने जुळलेले लग्न तुटल्याचे सांगितले. नात्यातील अनेक प्रतिष्ठितांकडून समजूत घालूनही ते ऐकत नसल्याचे पाहून पीडित मुलीने कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी योगेशविरुद्ध बलात्कार तसेच त्याच्यावर आणि त्याच्या भावावर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Future Bride Rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.