गाडीवाला आया घरसे कचरा निकाल वाले बैरागीच राहिले उपेक्षित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:07 AM2020-02-22T00:07:48+5:302020-02-22T00:09:26+5:30

‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला.

'Gadiwala Aya Gharse Kachra Nikal' fame Bairagi remains neglected | गाडीवाला आया घरसे कचरा निकाल वाले बैरागीच राहिले उपेक्षित 

गाडीवाला आया घरसे कचरा निकाल वाले बैरागीच राहिले उपेक्षित 

Next
ठळक मुद्देदेशवासीयांना वेड लावणाऱ्या कलावंताला हवी ओळख अन् हक्काचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून गीताने देशभर पोहचलेल्या या कलावंताच्या गीताचा उपयोग सरकारी यंत्रणेने हवा तसा करून घेतला. सोशल मीडियावरूनही या गीताचे हवे तसे मनोरंजनात्मक चित्रिकरण झाले. मात्र स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला. नेमके तेच दु:ख आणि भावना ‘लोकमत’मध्ये दिलेल्या भेटीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर होत्या.
श्याम बैरागी मूळचे मध्य प्रदेशातील मंडलाचे. प्राथमिक शाळा इंद्रीटोला येथे ते शिक्षक आहेत. ‘गाडीवाला आया’ हे गीत त्यांनी २०१६ मध्ये लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देत असताना त्यांना हे लिहिण्याची प्रेरणा झाली. याच दरम्यान मंडला नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना स्वच्छता अभियानावर गीत लिहिण्यास सुचविले. यातूनच या गीताचा जन्म झाला. पुढे जबलपूरमधील स्वरदर्पण या स्टुडिओडून गीताचे ध्वनिमुद्रण झाले. तेव्हापासून हे गाणे शहरातील कचरा संकलन केंद्राच्या वाहनांवर वाजायला लागले.
अल्पावधीत लोकांच्या ओठावर आलेले हे गीत एका मित्राच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर पोहचले. या दरम्यान बैरागी यांनी ‘स्याही दिल की डायरी’ नावाचे यु ट्युब चॅनल मित्रांसोबत भागीदारीत उघडले. त्यावर हे गीत अपलोड झाले. मागील सहा महिन्यापासून हे चॅनल बंद पडले आहे. हे गीत नंतर व्हायरल होत गेले. गायक, गीतकाराचा पत्ता नसलेले हे गाणे असेच व्हायरल होत राहिले. राजस्थान, बिहार, गोवा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, झारखंडनंतर आता महाराष्ट्रातील नागपुरातही हे गीत वाजत आहे.
आनंद आणि दु:खही
या संदर्भात भावना व्यक्त करताना श्याम बैरागी म्हणाले, जनतेच्या सामाजिक जाणिवा वाढविण्यासाठी आपण भविष्यातही कार्यरत राहू. आपली कला देशभर पोहचली, आपले गीत नागपुरातही वाजत आहे, याचा आनंद आहे. या गीताला आवाज आणि रेकॉर्डिगही आपलेच आहे. मात्र कलावंताकडे दुर्लक्ष करून त्याच्या प्रतिभेचा आणि परिश्रमाचा वापर व्हावा याचे दु:ख आहे.

Web Title: 'Gadiwala Aya Gharse Kachra Nikal' fame Bairagi remains neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.