मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी गडकरी

By admin | Published: March 18, 2015 02:44 AM2015-03-18T02:44:14+5:302015-03-18T02:44:14+5:30

विदर्भाचा सर्वांगीण विकास आणि लाखो युवकांसाठी रोजगाराची द्वारे खुली करणाऱ्या मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ....

Gadkari as president of the Advisory Committee of the MIHAN project | मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी गडकरी

मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी गडकरी

Next

नागपूर : विदर्भाचा सर्वांगीण विकास आणि लाखो युवकांसाठी रोजगाराची द्वारे खुली करणाऱ्या मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मिहानसंदर्भात पूर्वी स्थापन केलेल्या कार्य समित्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी अध्यादेश जारी केला आहे. १३ सदस्यांच्या समितीत गडकरी यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तानाजी सत्रे, प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय राऊत, विदर्भ आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष विलास काळे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्षक अतुल पांडे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी हेमंत गांधी, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, किशोर वानखेडे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे मुख्य अभियंते सुभाष चहांदे यांचा समावेश आहे. पुढील आदेशापर्यंत समिती कार्य करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gadkari as president of the Advisory Committee of the MIHAN project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.