गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:43+5:302021-06-22T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वारसास्थळांमध्ये सामील असलेली उच्च न्यायालयाची जुनी इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारसास्थळांमध्ये सामील असलेली उच्च न्यायालयाची जुनी इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात यावर वृत्त प्रकाशित करीत सरकार व प्रशासनाचे लक्षही वेधले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली तसेच या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची ताकीदही दिली.
जागतिक योगदिनानिमित्त सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील जुन्या उच्च न्यायालय इमारत परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करीत गडकरी यांनी इमारतीचे अवलोकन केले. तेव्हा ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांना म्हणाले, या इमारतीचा समावेश वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. इमारतीची जीर्ण अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, इमारतीच्या दुरुस्तीसाठी काही मदत लागत असेल तर सांगा, पण या इमारतीचे तातडीने नूतनीकरण करा.