गायधनींचा ‘देवदूत’ जागतिक भाषेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:48+5:302021-01-04T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाकवी सुधाकर गायधनी यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ ‘देवदूत’ जागतिक भाषेक प्रकाशित झाला आहे. या काव्यग्रंथाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाकवी सुधाकर गायधनी यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ ‘देवदूत’ जागतिक भाषेक प्रकाशित झाला आहे. या काव्यग्रंथाचे रोमानियन भाषेतील अनुवाद प्रसिद्ध रोमानियन कवी प्रा. डॉ. लिविअु पेन्डेफुंडा यांनी केला असून, तो रोमानियाच्या कान्टॅक्ट इंटरनॅशनलच्या अंकात प्रकाशित झाला आहे. या नियतकालिकाचे जगभर वाचक आहेत.
यापूर्वीच प्रा. डॉ. ओम बियाणी यांनी मराठी ‘देवदूत’चे इंग्रजीत ‘देवदूत- दी एन्जल’ या शिर्षकाने अनुवाद केला आहे. याच अनुवादावरून रोमानियन, चायनीज, तामिळ भाषेतही अनुवाद झाले आहेत. हिंदी साहित्यिक भगवान वैद्य ‘प्रखर’ यांनीही या काव्यग्रंथाचे हिंदी अनुवाद करून तो प्रकाशित केला आहे. यातील काही कवितांचे बंगाली आणि गुजराती भाषेत अनुवाद झाले आहे. देवदूतच्या चायनीज भाषांतरकार कवयित्री जून यंग यांनी या काव्यसंग्रहामुळे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांची आठवण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अमेरिका येथील ‘डेस्टाइन लिटरेर’ या रोमानियन-इंग्रजी नियतकालिकाने डिसेंबर २०२०च्या अंकात गायधनी यांच्या सविस्तर परिचयासह इंग्रजी देवदूतातील ११५ ओळी प्रकाशित केल्या. गौरी देशपांडे आणि आनंद जोग या दोघांनी गायधनींच्या ‘कब्रितला समाधिस्त’ या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद केला असून त्यावरून रोमानियन लेखक संघाची सदस्या प्रसिद्ध कवयित्री डॉ. दाना ओपरिता या रोमानियन भाषेत अनुवाद करीत आहेत. युनेस्को अधिकृत विश्व कवी परिषदेने मंगोलिया येथे पार पडलेल्या संमेलनात गायधनी यांना साहित्यातील मानद डी.लिट.ने सन्मानित केले आहे. गायधनी यांच्या रूपाने एका मराठी कवितेला युरोप-अमेरिकेसह आशियायी देशात असा जागतिक लौकिक पहिल्यांदाच प्राप्त झालेला आहे.