विदर्भात सर्वाधिक गारठले गोंदिया, भंडारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:42 PM2020-12-23T21:42:58+5:302020-12-23T21:45:34+5:30
Gaindia, Bhandara is the highest cold , nagpur news काही दिवसापासून सुरू असलेला गारठा बुधवारीही कायम आहे. आर्द्रतेत सातत्याने घट हाेत असल्याने गारठा वाढला आहे. दरम्यान, विदर्भामध्ये गाेंदिया व भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गारठा अनुभवायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसापासून सुरू असलेला गारठा बुधवारीही कायम आहे. आर्द्रतेत सातत्याने घट हाेत असल्याने गारठा वाढला आहे. दरम्यान, विदर्भामध्ये गाेंदिया व भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गारठा अनुभवायला मिळत आहे. या दाेन्ही जिल्ह्यात सर्वात कमी ८ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे.
दिल्लीसह पंजाब, हरियाणामध्ये थंडी वाढताच मध्य भारत व विदर्भात त्याचे परिणाम जाणवत आहेत. विदर्भात रात्रीच्या वेळी थंडीचा प्रकाेप चांगलाच वाढला आहे. गेलेल्या दिवसाच्या तुलनेत किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी गारठा कायम आहे. बुधवारी नागपुरात ९.२ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. कमाल तापमान २९.१ अंशावर हाेते. गाेंदियानंतर यवतमाळ जिल्ह्यात कमी म्हणजे ८.५ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. यानंतर वर्धा ९.२ अंश, चंद्रपूर ९.४ अंश, वाशिम १०, अकाेला १०.६, बुलडाणा ११.३ तर अमरावतीत १३ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे. आर्द्रतेमध्ये सातत्याने घट हाेत असल्याने थंडीमध्येही वाढ झाली आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्यात ५९ डिग्री म्हणजे ३.५ डिग्रीची घट दर्शविण्यात येत आहे. अशाच प्रकारे गाेंदियात ४.२ डिग्री घट यासह ६७ डिग्री आर्द्रता नाेंदविण्यात आली. वर्धा ४.१ तर चंद्रपूरमध्ये आर्द्रतेत ३.८ ची घट नाेंदविण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात किमान तापमानात किंचित वाढ हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला असला तरी वातावरणातील गारठा असाच कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.