पोलिसाला नोकरी खाण्याची धमकी देणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:42+5:302021-04-06T04:07:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यानंतर त्याची नोकरी खाण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेदम ...

Gajaad who threatened to fire the police | पोलिसाला नोकरी खाण्याची धमकी देणारा गजाआड

पोलिसाला नोकरी खाण्याची धमकी देणारा गजाआड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यानंतर त्याची नोकरी खाण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेदम बदडले. नंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषभ प्रकाश कोरके (रा. संजय गांधीनगर) असे त्याचे नाव आहे.

आरोपी कोरके आणि दुसऱ्या एका वाहनचालकाने एकमेकांच्या वाहनांना धडक दिली. त्यामुळे त्यांच्यात नंतर भांडण सुरू झाले. रविवारी रात्री ११. ४५ लाही माहिती कळाल्यानंतर म्हाळगीनगर चौकात हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रीतेश भोजराज देशपांडे (३४), हवलदार सुरेंद्र यांच्यासोबत पोहचले. तेथे त्यांनी भांडण करणारांना आवरण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी कोरके याने प्रितेशला आपण शिवसेनेचे कार्यकर्ते असून तुम्ही चांगले वागले नाही तर तुमची नोकरी खाऊन टाकेन, अशी धमकी दिली. शिवीगाळ करून कॉलरही पकडली. प्रकरण हाणामारीवर आले. त्यानंतर प्रीतेशने आपल्या सहकारी पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले आणि आरोपी कोरकेला बेदम चोप दिला. नंतर त्याच्याविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Gajaad who threatened to fire the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.