पाचपावलीत रेल्वे ट्रॅकवर जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:48 AM2017-10-11T01:48:16+5:302017-10-11T01:48:46+5:30

एका महाविद्यालयाच्या सर्वेक्षणाच्या आधारावर पाचपावली पोलीस ठाण्याला उत्कृष्ट कामासाठी पुरस्कृत करण्यात आले.

 Gambling on Railway Tracks | पाचपावलीत रेल्वे ट्रॅकवर जुगार

पाचपावलीत रेल्वे ट्रॅकवर जुगार

Next
ठळक मुद्देउघड्यावरच भरतो डाव : स्थानिक महिलांची पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महाविद्यालयाच्या सर्वेक्षणाच्या आधारावर पाचपावली पोलीस ठाण्याला उत्कृष्ट कामासाठी पुरस्कृत करण्यात आले. परंतु याच ठाण्यांतर्गत येणाºया मेहंदीबाग रेल्वे लाईन, लालगंज, खैरीपुरा व बांग्लादेश परिसरात दिवाळीच्या पूर्वीच जुगाºयांचे अड्डे सजायला लागले आहे. परिसरातील एका गुन्हेगाराच्या तीन घरांमध्ये पहिलेपासूनच जुगार अड्डा सुरू आहे. असे असतानाही दिवाळी उत्सवाच्या पहिले मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे भरविण्याची तयारी सुरू झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी मेहंदीबाग रेल्वे लाईनजवळ ताडपत्री टाकून जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे. उघड्यावर सुरू असलेल्या अड्ड्याची माहिती मिळताच लोकमतची टीम मेहंदीबाग रेल्वे लाईनवर पोहचली. तिथे एका भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात काही जुगारी खेळण्यात व्यस्त होते. हे दृश्य लोकमत टीमने आपल्या मोबाईलमध्ये टिपले. हा अड्डा रेल्वेच्या परिसरात येत असल्याने आरपीएफ बरोबरच पाचपावली पोलिसांचे याकडे का दुर्लक्ष होत आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसरातील महिला जुगार अड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या पतींना जुगाराचे व्यसन लागले आहे. बहुतांश वेळा ठाण्याचे पोलीस कर्मचारी अड्ड्याच्या संचालकांशी हात मिळवून परत जात असल्याचे परिसरातील लोकांकडून सांगण्यात येते. गेल्या तीन वर्षापासून परिसरातील महिलांनी पोलीस अधिकाºयांना लिखित तक्रारी दिल्या आहेत.
कोट्यवधीची संपत्ती कशी जमविली?
सूत्रांच्या नुसार ही गॅँग वस्तीतील गरीब कुटुंबाकडून एक रुम भाड्याने घेऊन जुगार अड्डा संचालित करीत होती. परंतु आता जुगार अड्डा चालविणाºयांनी परिसरात तीन ते चार इमारती खरेदी केल्या आहेत. या इमारतींमध्ये आता जुगार अड्डा संचालित केला जात आहे. सखोल चौकशी केल्यास अड्डा संचालकाकडे कोट्यवधीची संपत्ती सापडू शकते. सट्ट्याच्या रकमेचा चुकारा ग्राहकांना काही खास पानठेले, हॉटेल व नाश्त्याच्या दुकानात करण्यात येतो.
लहानग्यांकडून पोलिसांवर लक्ष
या जुगार अड्ड्यावर ग्राहकांना चहा, नाश्ता देण्याचे काम बालकांकडून करविण्यात येत असल्याची माहिती परिसरातील लोकांनी दिली. त्यासाठी मुलांना २०० रुपये पेक्षा जास्त रक्कम देण्यात येते. ही मुले शिक्षण सोडून पैसा कमविण्यासाठी अशा अवैध धंद्यात फसत आहे. ही मुले परिसरात खेळताना पोलिसांच्या कारवाईपर सुद्धा लक्ष ठेवून असते.

 

Web Title:  Gambling on Railway Tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.