नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:33 PM2019-06-06T22:33:15+5:302019-06-06T22:34:01+5:30

घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

The game of infamous Pintu Rewatkar in Narkhed area of Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम

नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध धंद्याच्या चढाओढीतून हत्या : एक आरोपी अटकेत

लोकमत न्यूज  नेटवर्क
नागपूर ( नरखेड ): घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रतिस्पर्धी गटातील कुख्यात सतीश जाधव व त्याच्या दोन साथीदारांनी वडाउमरी येथे पिंटूचा गेम केला. मृत व आरोपी यांच्यावर चोरी, घरफोडी, डकेती, दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सतीश जाधव याला गुरुवारी सकाळी काटोल येथून ताब्यात घेतले.
मृत पिंटू रेवतकर हा बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान प्लॅटिना मोटर सायकलवर वडाउमरी गावामध्ये फिरत असताना अचानक सतीश जाधव, वैभव जाधव रा. खेडी कर्यात व हेमराज बाभुलकर रा. तिनखेडा यांनी पिंटूवर हल्ला केला. धोका दिसताच पिंटू मोटरसायकल सोडून गावाच्या बाहेर पळायला लागला. तिघांनी त्याचा पाठलाग करून त्याला गावाबाहेरील नाल्याजवळ गाठले. आरोपींनी पिंटूच्या डोके,पोट व हातावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर पळ काढला. गावाकडे येणाऱ्या रवी भैसे याला पिंटू नाल्यात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याने पिंटूचा भाऊ गणेश याला याबाबत माहिती दिली. गणेश लागलीच घटनास्थळी दाखल झाला तेंव्हा पिंटू शेवटच्या घटका मोजत होता. त्याने मृत्यूपूर्वी हत्या करणाऱ्यांची नावे गणेशला सांगितली. गणेश रेवतकर याच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी आरोपी सतीश जाधव (५३) त्याचा मुलगा वैभव सतीश जाधव (२२) रा. खेडीकर्यात व हेमराज गजानन बाभुळकर (४०) रा. तिनखेडा यांच्या विरुद्ध भांदविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सतीश जाधवला ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपीचा पोलीस पथक शोध घेत आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे,धनराज भूक्ते, नितेश पुसाम, मिलिंद राठोड, राजेश हावरे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Web Title: The game of infamous Pintu Rewatkar in Narkhed area of Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.