कुख्यात दिवटेचा गेम प्लान

By admin | Published: August 29, 2015 03:05 AM2015-08-29T03:05:43+5:302015-08-29T03:05:43+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला यवतमाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार प्रवीण दत्तूजी दिवटे (वय ४१) याला पोलिसांनी अटक केली नसून, ‘गेम प्लान‘नुसार त्यानेच स्वत:चे ...

Game plan for infamous day | कुख्यात दिवटेचा गेम प्लान

कुख्यात दिवटेचा गेम प्लान

Next

स्वत:च घडवून आणले अटक नाट्य ?
नरेश डोंगरे  नागपूर
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला यवतमाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार प्रवीण दत्तूजी दिवटे (वय ४१) याला पोलिसांनी अटक केली नसून, ‘गेम प्लान‘नुसार त्यानेच स्वत:चे अटकनाट्य घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे. या संबंधाने नागपूर, यवतमाळ आणि अमरावतीच्या गुन्हेगारी जगतात उलटसुलट तर्क वितर्क लावले जात आहे.
दिवटेचे ठिकठिकाणच्या खतरनाक गुंडांशी सलोख्याचे संबंध आणि लेनदेणचे व्यवहार आहे. यवतमाळमधील बांगरनगरात त्याचे राहाणे आहे. मात्र, तो अलिकडे यवतमाळात कमी आणिबाहेरच जास्त वावरतो. जमिनी, बिल्डरचे वादग्रस्त सौदे पद्धतशिर निकाली काढण्याचे त्याचे तंत्र आणि मांडवलीचे कसब चांगल्याचांगल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. त्याचमुळे गुन्हेगारी जगतात दिवटे ‘गेम प्लानर‘ म्हणूनही ओळखला जातो. स्वत:ला पोलिसांसमोर किंवा कारागृहात ठेवून तो गेम करतो. यवतमाळात त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अशाच प्रकारे लंबे केल्याची चर्चा ऐकू येते. आर्थिक व्यवहाराबाबत दिवटे कमालीचा सतर्क आहे. त्यामुळे त्याचे फार काळ कुणाशी सख्य राहात नाही. अमरावतीच्या एका कुख्यात गुन्हेगारासोबत ‘कच-याच्या कंत्राटावरून‘ त्याचे ‘बिनसले, जमले‘ अशी काही दिवसांपासून चर्चा जोरात आहे. नागपुरातील एका गुन्हेगारासोबतही त्याचे दोन महिन्यांपुर्वी फाटले. त्याच्या होमटाऊनमधील अनेक गुन्हेगार त्याच्या आणि तो प्रतिस्पर्ध्यांच्या हिटलिस्टवर आहे.

Web Title: Game plan for infamous day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.