गांधी जयंती विशेष : चरख्याची सर्वांत लहान प्रतिकृती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 06:30 AM2020-10-02T06:30:42+5:302020-10-02T06:31:20+5:30

सूतही येते कातता : नागपूरच्या जयंत तांदूळकर यांनी साकारली कलाकृती

Gandhi Jayanti Special: The smallest replica of Charkha! | गांधी जयंती विशेष : चरख्याची सर्वांत लहान प्रतिकृती!

गांधी जयंती विशेष : चरख्याची सर्वांत लहान प्रतिकृती!

googlenewsNext

नागपूर : नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील निवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेले जयंत तांदूळकर यांनी नखावर मावेल एवढ्या लहान चरख्याची प्रतिकृती साकारली आहे. हा चरखा त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्वदेशी संकल्पनेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला समर्पित केला आहे.

जयंत तांदूळकरांनी सूत कातणाऱ्या चरख्याचे विविध मॉडेल साकारले आहेत. त्यातील सर्वात लहान चरखा ३.२० मि.मी. लांबीचा, २.६८ मि.मी. रुंदीचा अन् ३.०६ मि.मी. उंचीचा आहे. यासाठी त्यांनी अगदी लहान लाकडी स्टिक, स्टील वायर, कॉटनचा धागा यांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, हा चरखा केवळ दिखावा किंवा प्रतिरूप नव्हे तर यावर सूत कातता येते. हा चरखा पूर्णपणे कार्यरत असून, गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व अन्य विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रेकॉर्डसाठी नामांकित करण्यात आला आहे. हा जगातील सर्वात लहान चरखा असल्याचा तांदूळकर यांचा दावा आहे.

स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख शस्त्र म्हणून महात्मा गांधी यांनी चरखा वापरला होता. स्वदेशीचा नारा दिला होता. त्याच नाºयाच्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारताचे बीजारोपण झाले होते. नव्या युगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच नारा दिला आहे. त्याच संकल्पनेला दृढ करण्यासाठी माझा हा अत्यंत लहान चरखा आहे.
- जयंत तांदूळकर (कलाकार व वरिष्ठ लेखापाल)

Web Title: Gandhi Jayanti Special: The smallest replica of Charkha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.