कुलगुरुंविरोधात ‘अभाविप’ची ‘गांधीगिरी’ : गुलाबपुष्प देऊन विधीसभा सदस्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:14 PM2019-03-13T22:14:44+5:302019-03-13T22:17:34+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीसाठी येणाऱ्या सर्व विधीसभा सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कुलगुरूंकडून शैक्षणिक दहशतवादाच्या मुद्यावर स्पष्टीकरणाची मागणी करावी, अशी विनंती करण्यात आली.

'Gandhigiri' of ABVP against Vice-Chancellor: Welcoming senate members by giving Gulab flower | कुलगुरुंविरोधात ‘अभाविप’ची ‘गांधीगिरी’ : गुलाबपुष्प देऊन विधीसभा सदस्यांचे स्वागत

कुलगुरुंविरोधात ‘अभाविप’ची ‘गांधीगिरी’ : गुलाबपुष्प देऊन विधीसभा सदस्यांचे स्वागत

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पाठविणार पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीसाठी येणाऱ्या सर्व विधीसभा सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कुलगुरूंकडून शैक्षणिक दहशतवादाच्या मुद्यावर स्पष्टीकरणाची मागणी करावी, अशी विनंती करण्यात आली.
अभाविप महानगर मंत्री वैभव बावनकर, सहमंत्री अमित पटले, समर्थ रागीट, करण खंडाळे, शिवेश हारगुडे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे कुलगुरूंना ‘गेट वेल सून’चे पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कुलगुरूंची मानसिकता बिघडली असून त्यांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना ‘गेट वेल सून’चे पत्र पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सांगितले.

Web Title: 'Gandhigiri' of ABVP against Vice-Chancellor: Welcoming senate members by giving Gulab flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.