गांधीसागर तलावाचे होणार सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:18+5:302021-08-14T04:13:18+5:30
नागपूर : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐतिहासिक गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राज्य सरकारसोबत मनपासुद्धा ...
नागपूर : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐतिहासिक गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राज्य सरकारसोबत मनपासुद्धा निधी उपलब्ध करून देणार आहे.
शुक्रवारी गांधीसागरच्या प्रस्तावित विकासावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासमक्ष सादरीकरणात करण्यात आले. यावेळी आ. प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होते. गांधीसागर तलावाच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. ध्रुव कन्सल्टंसी कंपनीचे आर्किटेक्ट संदीप जोशी म्हणाले, तलावाच्या चारही बाजूला सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. भाऊसाहेब पागे उद्यानापर्यंत पोहोचण्यासाठी एक पूल बांधण्यासह अनेक विकास कामे करण्यात येणार आहे.
- गांधीसागर तलाव हेरिटेज श्रेणीत येतो. राज्य सरकारतर्फे १२ कोटी आणि मनपातर्फे २.९० कोटी रुपयांची तरतूद सौंदयीकरणासाठी करण्यात आली असून विकास कामे वेगाने करण्यात येईल.
- शिवाय पायी ट्रॅक आणि प्रसाधनगृहासह पाण्याची व्यवस्था राहील. मनोरंजनासाठी बाल भवनात एक मोठी इमारत उभारण्यात येईल.