Ganesh Festival 2018 : बाप्पा, सर्वांची संकटं दूर कर ! मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:03 AM2018-09-16T00:03:00+5:302018-09-16T00:04:33+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यावे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Ganesh Festival 2018: Bappa, overcome the problems of all! Congratulate the Chief Minister's post | Ganesh Festival 2018 : बाप्पा, सर्वांची संकटं दूर कर ! मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

Ganesh Festival 2018 : बाप्पा, सर्वांची संकटं दूर कर ! मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील विविध गणेश मंडळांना भेटी 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यावे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व विविध उपक्रमांची प्रशंसा करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली. यावेळी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भेंडे ले-आऊट, दत्तनगर येथील श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनद्वारा संचलित श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी अध्यक्ष ईश्वर ढेंगळे, सचिव रमेश राऊत, कोषाध्यक्ष नीलेश राऊत, उपाध्यक्ष महेश गुडधे, प्रशांत दरेकर, दीपक चोपडे, संजय देशमुख, मदन कर्णिक, पीयूष मुसळे, नीलेश गायकवाड व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ सार्वजनिक गणेश मंडळ येथे भेट दिली व श्री गणेशाचे दर्शन घेतले. संयोजक सुनील हिरणवार यांनी स्वागत केले. वर्मा ले-आऊट येथील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष नितीन कडवे यांनी, सुभाष नगर येथील लोकमान्य सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष प्रमोद नागोलकर व मान्यवरांनी सत्कार केला. प्रसाद नगर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष पीयूष कायदे यांनी, प्रताप नगर येथील बाल गणेश सार्वजनिक गणेश मंडळातर्फे सारंग कदम व मान्यवरांनी सत्कार केला. दाते ले-आऊट येथील शिवगणेश सार्वजनिक गणेश मंडळ, सोनेगाव व स्नेह नगर येथील सार्वजनिक गणेश मंडळ, मनीष नगर येथील गुरुकृपा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच एकता सार्वजनिक गणेश मंडळ येथेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Ganesh Festival 2018: Bappa, overcome the problems of all! Congratulate the Chief Minister's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.