Ganesh Festival 2018 : नागपुरात  कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:37 PM2018-09-22T21:37:27+5:302018-09-22T21:41:23+5:30

जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

Ganesh Festival 2018: Respond to Ganesh Visharjan in the artificial ponds in Nagpur | Ganesh Festival 2018 : नागपुरात  कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद

Ganesh Festival 2018 : नागपुरात  कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देअखेरच्या दिवशी देणार स्वयंसेवी संस्था सेवा 

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
महापालिकेच्या दहाही झोन मिळून सुमारे २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. गांधीसागर, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली तरी या ठिकाणी मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या तलावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलची सेवा
- फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहे. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरच्या दिशेने ठेवलेल्या कृत्रिम टँकमध्ये शुक्रवारपर्यंत एकूण १७३४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. याच ठिकाणी १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्था देणार सेवा
 शहरातील विविध पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था मनपाच्या खांद्याला खांदा लावून अखेरच्या दिवशी विसर्जन मिरवणूकसमयी सेवा देणार आहे. या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक विविध ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतील. निर्माल्य कलशात निर्माल्य दान करण्यासाठी आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करतील. या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करा : महापौर
महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पूवीपासूनच जनजागृती केली आहे. जलप्रदूषण होऊ नये, यासाठी पूर्ण प्रयत्न आहेत. नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे. 

Web Title: Ganesh Festival 2018: Respond to Ganesh Visharjan in the artificial ponds in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.