गणेश विसर्जन वाहन आपल्या दारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:53+5:302021-09-16T04:12:53+5:30

मनपाची सर्व झोनमध्ये फिरत्या वाहनांची व्यवस्था लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जलप्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली ...

Ganesh Immersion Vehicle at your door! | गणेश विसर्जन वाहन आपल्या दारी!

गणेश विसर्जन वाहन आपल्या दारी!

googlenewsNext

मनपाची सर्व झोनमध्ये फिरत्या वाहनांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जलप्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी सर्व झोनमध्ये फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार तलावात मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु तलावांवर पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच झोन निहाय फिरते विसर्जन वाहनाची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहे. भाविक आपल्या झोनमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करुन वाहनांसाठी माहिती देऊ शकतात. विसर्जनाची वेळ झोनल कार्यालयाकडून कळविण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले यांनी सांगितले.

...

२४५ कृत्रिम टँक लावणार

शहरात यंदा दोन लाखाहून अधिक घरगुती तर जवळपास दोन हजार सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या मूतीर्ची स्थापना केली आहे. शहरात विविध भागात गणेश विसर्जनासाठी २४८ कृत्रिम टँक लावले जाणार आहे. गरज वा मागणीनुसार यात वाढ केली जाणार आहे. नागरिकांनी कृत्रिम टँकमध्ये मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.

..

झोननिहाय लावण्यात येणारे कृत्रिम तलाव

झोन कृत्रिम टँक

लक्ष्मीनगर २६

धरमपेठ ५१

हनुमाननगर २७

धंतोली १९

नेहरूनगर ४०

गांधीबाग २५

सतरंजीपुरा १४

लकडगंज १८

आसीनगर १०

मंगळवारी १८

Web Title: Ganesh Immersion Vehicle at your door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.