गणेश मंडळांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:10 AM2021-09-07T04:10:49+5:302021-09-07T04:10:49+5:30
मनपाचे आवाहन : गणेशोत्सवातून जनजागृती करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता ...
मनपाचे आवाहन : गणेशोत्सवातून जनजागृती करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लसीकरणासाठी जनजागृती करावी, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात आला आहे. परंतु धोका अजूनही कायम आहे. मनपातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. पुढील दिवस हे सण-उत्सवाचे आहेत. संक्रमणाचा धोका लक्षात घेता गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करावी.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोविड-१९ लसीकरण मोहीम जनजागृती व जनसहभाग नियोजन संदर्भातील निर्देशानुसार, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे. यासाठी झोननिहाय गणेश उत्सव मंडळांच्या बैठकी घ्यावात. १८ वर्षावरील लसीकरण न झालेले व दुसऱ्या डोससाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करून मंडळांनी करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन करून तसेच डोस न घेतलेल्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संजय चिलकर यांनी दिली.
..
नियमांचे काटेकोर पालन करा
सार्वजनिक गणेश उत्सवात कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करून जनजागृती केल्यास उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करता येईल. या अनुषंगाने झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंडळांना आवश्यक मार्गदर्शन करावे तसेच नियमावलीचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.