गणेशोत्सव २०२१; मूर्ती आमची.. किंमत तुमची...; कापड व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 07:30 AM2021-09-10T07:30:00+5:302021-09-10T07:30:02+5:30

Nagpur News नागपुरात महालमधील एका कापड व्यवसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनोखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे.

Ganeshotsav 2021; The idol is ours .. the price is yours ...; A unique venture of a textile professional | गणेशोत्सव २०२१; मूर्ती आमची.. किंमत तुमची...; कापड व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम

गणेशोत्सव २०२१; मूर्ती आमची.. किंमत तुमची...; कापड व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम

Next
ठळक मुद्देगोळा झालेला निधी अनाथाश्रमातील मुलांसाठी


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्तींना मागणी असते. भाविक आपल्या शक्यतेप्रमाणे गणेश मूर्तींची खरेदी करून घरी स्थापना करीत असतात. महालमधील एका कापड व्यवसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनोखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे. (Ganeshotsav 2021; The idol is ours .. the price is yours ...; A unique venture of a textile professional)


शिवाजी पुतळा ते गांधीसागर तलाव रोडवरील या कापड व्यवसायिकाने दुकानामध्ये लहान मूर्तींचे प्रदर्शन लावले आहे. मात्र या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या नाहीत. भाविकांनी एक रूपयापासून यथाशक्ती कितीही दान करावे, त्यांना ही मर्ती दिली जात आहे. दुकान मालक नरेंद्र वनवानी यांनी सांगितले, या मूर्ती अनाथाश्रमाच्या मुलांनीच तयार केल्या आहेत. त्या संपूर्णपणे मातीच्या असून पीओपी मूर्त्यांमुळे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्याचे वनवानी यांनी सांगितले. दानरुपात गोळा होणारा निधी पुढे अनाथाश्रमातील मुलांच्या मदतीसाठीच दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवात एक सामाजिक कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ganeshotsav 2021; The idol is ours .. the price is yours ...; A unique venture of a textile professional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.