Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन

By मंगेश व्यवहारे | Published: September 9, 2022 01:45 PM2022-09-09T13:45:05+5:302022-09-09T13:46:20+5:30

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषाने महाल परिसर दुमदुमून गेला होता.

Ganeshotsav 2022 Immersion of the king of Nagpur | Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन

googlenewsNext

नागपूर - नागपुरातील मानाच्या गणपतीचा मान मिळविलेल्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी दहा वाजता पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी दीपक जैस्वाल व दीप्ती जैस्वाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मिरवणुकीत कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. ढोल ताशांचा गजर बँड पथकांचा तालावर नागपूरच्या राजाची मिरवणूक रेशीम बागेतून निघाली. पांढरे शुभ्र वस्त्र आणि डोक्यावर भगवी टोपी घालून भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषाने महाल परिसर दुमदुमून गेला होता. चौका चौकात मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. कोराडी येथील कृत्रिम तलावावर दुपारी नागपूरच्या राज्याचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचे संचालन भाऊ पत्की, संजय निंबाळकर, अनिल मानापुरे, अरविंद जैस्वाल यांनी केले.
 

Web Title: Ganeshotsav 2022 Immersion of the king of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.