नागपुरात उड्डाणपुलाखालील पार्कींगच्या वसुलीसाठी गुंडांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:56 PM2018-05-02T23:56:25+5:302018-05-02T23:56:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाहनांची गर्दी विचारात घेता वाहनधारकांना पार्कींगची सुविधा व्हावी. याहेतुने महापालिकेने नवीन पार्किंग धोरण आणले आहे. मात्र कंत्राटदारांनी कामावर ठेवलेले गुंड प्रवृत्तीचे कामगार वाहनधारक व सभ्य नागरिकांसोबत अरेरावी करून त्यांना वेठिस धरतात. असा धक्कादायक प्रकार पंचशील चौकालगतच्या बीग बाजार समोरील उड्डापुलाखालील महापालिकेच्या पार्किंगच्या ठिकाणी सुरू आहे.
पार्किंग शुल्क वसुलीसाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांचा समाजातील सर्व घटकांतील नागरिकांशी त्यांचा दैनंदिन संबंध येतो. याचा विचार करता पार्किंग शुल्काची वसुली करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र धंतोली परिसरातील उड्डाणपुलाखालील पार्किंग कंत्राटदार कनक रिर्सोसेस संचालक प्रकाश अंचलवार यांनी वाहनधारकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे युवक ठेवलेले आहेत. पार्किंश शुल्क वसूल करताना नागरिकांना ते धमकावतात. धंतोली परिसरात या गुंड प्रवृत्तीच्या कामगारांची दहशत आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष आहे. विशेष म्हणजे बीग बाजार व परिसरातील बाजारात प्रामुख्याने महिला खरेदीसाठी येतात. महिलांसोबतही येथील गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी असभ्य वर्तन करतात. एवढेच नव्हे तर पोलीस अधिकाºयांनाही ते जुमानत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पार्किग शुल्क वसुलीसाठी ठेवण्यात आलेले गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी तात्काळ हटविण्यात यावे. तसेच प्रकाश अंचलवार यांचा पार्किगचा कंत्राट रद्द करण्यात यावा. अशी महापालिकेच्या मागणी पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम)डी.डी.जांभूळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पार्किं ग शुल्क वसुलीसाठी ठेवण्यात आलेल्या कामगारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का. याची शहानिशा करण्याची गरज आहे.
कंत्राटदाराला नोटीस बजावून जाब विचारणार
बीग बाजार समोरील उड्डाणपुलाखालील पार्किंग कंत्राटदाराने ठेवलेल्या कामगारांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यासंदर्भात प्रकाश अचंलवार यांना नोटीस बजावून जाब विचारणार आहे. तसेच प्रकरणाची चौकशी करून वाहनधारकांना त्रास होत असल्यास संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता, मनपा