नागपुरात तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:52 PM2018-10-19T23:52:16+5:302018-10-19T23:53:00+5:30
हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग केला.
हिंगण्यातील तरुणीने (वय २५) दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ती घरात एकटी झोपलेली असताना शेजारी राहणारे आरोपी दौलत पवार, गणेश पवार आणि भास्कर जाधव यांनी तिला आवाज दिला. तिने दार उघडण्यास नकार दिला असता त्यांनी दाराला लाथ मारून ते तोडले. तरुणीच्या घरात शिरल्यानंतर आरोपी तिच्याशी अतिप्रसंगाचा प्रयत्न करू लागले. तिने विरोध करून आरडाओरड केली असता आरोपीने तिला मारहाण केली. दरम्यान आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी जमली. ते पाहून आरोपी पळून गेले. पीडित तरुणीने हिंगणा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला (वय ३६) गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास तिच्या ११ वर्षीय मुलीला घेऊन दुर्गा उत्सवाच्या महाप्रसादासाठी गेली होती. ती जेवण करीत असताना आरोपी मोनू प्रमोद बाथो (वय २०) याने मुलीला खेळण्यासाठी मोबाईल देण्याचे आमिष दाखवून बाजूला नेले आणि तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. मुलीने आरडाओरड केली असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बालिकेने हा प्रकार आईला सांगितला. आईने यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही १६ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडित महिला तिच्या पतीसह सदरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये राहतात. ते त्यांच्या (केअर टेकर) रूममध्ये झोपून असताना पहाटे ४ च्या सुमारास मुंबईती रहिवासी आरोपी राजेश अय्यर तेथे आला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्याने पतीसह अन्य कर्मचारी धावले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.