नागपुरात  लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:06 PM2018-07-04T23:06:58+5:302018-07-04T23:08:15+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने लुटमार करणाऱ्या  टोळीचा छडा लावून एका तडीपार गुंडासह सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Gang of robbers in Nagpur arrested | नागपुरात  लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा 

नागपुरात  लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा 

Next
ठळक मुद्देतडीपार गुंडासह सहा जणांना अटक : कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने लुटमार करणाऱ्या  टोळीचा छडा लावून एका तडीपार गुंडासह सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
श्याम राममूर्ती शर्मा (वय २२), आकाश ऊर्फ बग्गा सतीश मेश्राम (वय १९), पवन ऊर्फ किस्सी तुलसीराम कोरडे (वय २१), आवेश ऊर्फ कालू राजू अन्सारी (वय २०), दुर्गेश नमूचंद टेंभरे (वय २०), सोहित राजू ठाकूर (वय १९), अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी एमआयडीसीतील इंदिरामाता नगरात राहतात. कोरडे हा तडीपार गुंड आहे.
२४ जूनच्या पहाटे १.१५ वाजता उपरोक्त आरोपींनी योगेंद्र नामदेवराव चौधरी (वय ३७, रा. पवनसूतनगर, हुडकेश्वर) हे उबेर कारचालक हिंगण्यातून वाडी रोडकडे जाणाºया टी-पॉर्इंटवर थांबले असताना आरोपींनी त्यांना घेरले. त्यांना मारहाण करून तलवारीचा धाक दाखवला आणि दोन हजार रुपये, मोबाईल तसेच त्यांच्या ताब्यातील कार एमएच ४९/एफ १५५९ हिसकावून नेली. गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पथकही त्याचा समांतर तपास करीत होते. एपीआय प्रशांत चौगुले यांना या गुन्हेगाराची टीप मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, एसीपी संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संदीप भोसले, एपीआय प्रशांत चौगुले, गोरख कुंभारा,संजय चव्हाण, पीएसआय श्रीनिवास मिश्रा, वसंता चौरे, हवालदार सुनील चौधरी, नरेश सहारे, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, मंगेश मडावी, राहुल इंगोले, आशिष देवरे, देवीप्रसाद दुबे, राजेश सेंगर आणि नीलेश वडेकर यांनी उपरोक्त टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी या गुन्ह्यासोबतच अन्य एका लुटमारीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Gang of robbers in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.