रेल्वे प्रवाशांना विष खाऊ घालणाऱ्या टोळीचा छडा

By नरेश डोंगरे | Published: August 23, 2022 07:16 PM2022-08-23T19:16:29+5:302022-08-23T19:19:03+5:30

Nagpur News धावत्या रेल्वेत सहप्रवाशांची सलगी वाढवून त्याला विश्वासात घेतल्यानंतर खाण्या-पिण्याच्या चिजवस्तूतून विष खाऊ घालायचे आणि तो बेशुद्ध झाल्यास त्याच्या जवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू घेऊन पळणाऱ्या टोळीचा आरपीएफच्या पथकाने छडा लावला.

Gang who poisoned railway passengers arrested | रेल्वे प्रवाशांना विष खाऊ घालणाऱ्या टोळीचा छडा

रेल्वे प्रवाशांना विष खाऊ घालणाऱ्या टोळीचा छडा

Next
ठळक मुद्देआरपीएफने बांधल्या एकाच्या मुसक्याकेरळ पोलिसांच्या केले हवाली

नरेश डोंगरे

नागपूर - धावत्या रेल्वेत सहप्रवाशांची सलगी वाढवून त्याला विश्वासात घेतल्यानंतर खाण्या-पिण्याच्या चिजवस्तूतून विष खाऊ घालायचे आणि तो बेशुद्ध झाल्यास त्याच्या जवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू घेऊन पळणाऱ्या टोळीचा आरपीएफच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील एकाला अटक करण्यात आली असून, त्याला आरपीएफने केरळ पोलिसांच्य स्वाधिन केले.

चमन कुमार शाह (वय २४) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो चंपारणा (बिहार) मधील रहिवासी आहे. आरोपी चमनची एक टोळी आहे. ते वेगवेगळ्या प्रांतात रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान बाजुला बसलेल्या प्रवाशांसोबत लाडीगोडीने गप्पा करतात. त्यांचा विश्वास जिंकून त्या प्रवाशांना खाण्यापिण्याच्या चिजवस्तूतुन बेमालूमपणे विषाक्त पदार्थ (पावडर) खाऊ घालतात. प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या जवळची रोख रक्कम आणि माैल्यवान चिजवस्तू, दागिने घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरून जातात.

१९ ऑगस्टला चमन आणि त्याच्या साथीदारांनी अशाच प्रकारे ट्रेन क्रमांक १५०२४ मध्ये प्रवाशांना विषारी पावडर खाऊ घालून लुटले. त्रिवेंद्रम (केरळ)मध्ये जीआरपी, आरपीएफने हा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या टोळीतील आरोपी नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी आरपीएफचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांना व्हीडीओ, फोटो पाठवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार, पांडे यांनी स्थानिक आरपीएफ अधिकाऱ्यांची एक चमू तयार करून त्यांना आरोपी चमन शाहला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी नागपूर स्थानकावर जनरल कोच १८१८६०-सी मध्ये बसलेल्या चमनला आरपीएफच्या पथकाने जेरबंद केले.

Web Title: Gang who poisoned railway passengers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.